agriculture news in Marathi, agrowon, The government does not have information about the debt waiver district wise | Agrowon

कर्जमाफीची जिल्हानिहाय माहिती शासनाकडे नाही
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने ४६.५२ लाख शेतकऱ्यांना १४,३८८ कोटी कर्जाचे वाटप केल्याची माहिती अधिकारात सरकारने स्पष्ट केले. मात्र या संदर्भातील जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचीही कबुली दिली आहे. यामुळे एकूण कर्जवाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने ४६.५२ लाख शेतकऱ्यांना १४,३८८ कोटी कर्जाचे वाटप केल्याची माहिती अधिकारात सरकारने स्पष्ट केले. मात्र या संदर्भातील जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचीही कबुली दिली आहे. यामुळे एकूण कर्जवाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती मागितली होती. कर्जमाफीत एकूण शेतकऱ्यांची संख्या, एकूण मंजूर आणि नामंजूर अर्जाची संख्या, बँकेचे नाव, एकूण वाटप निधी याची जिल्हानिहाय माहिती त्यांनी शासनाकडे मागितली होती. यावर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी एकूण बँकेत जमा केलेल्या निधीच्या रकमेबाबत जिल्हानिहाय माहिती शासन स्तरावर उपलब्ध नाही.

तसेच विदर्भातील गावनिहाय माहितीसुद्धा शासन स्तरावर उपलब्ध नसल्याचे कळवले आहे.
 शासनाने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत  एकूण ३७ जिल्ह्यांतून ५६ लाख ५९ हजार १५९ अर्ज शासनाकडे प्राप्त झाले. यात सर्वाधिक अर्ज अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. नगरमधील संख्या ३ लाख ३४ हजार ९२० इतकी आहे.

तसेच १ हजार ६२० मुंबई उपनगर आणि २३ हजार ७१५ मुंबई शहरातील अर्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी राष्ट्रीयीकृत बँकांतील १९ लाख ८८ हजार २३४ खात्यांवरील कर्जमाफीला शासनाने मान्यता दिली आहे. त्यापोटी ७ हजार ७६६ कोटी ५५ लाख १३ हजार ४४० रुपये इतकी रक्कम बँकेला दिली असून, राष्ट्रीयीकृत बँकांनी ७ हजार ५८९ कोटी ९८ लाख २० हजार ८५७ रुपये इतकी रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप केली आहे. 

जिल्हा बँकेतील २६ लाख ६४ हजार ५७६ खात्यांवरील कर्ज मंजूर झाले असून, त्यापोटी ६ हजार ७७० कोटी १८ लाख ८८ हजार ७७२ रुपये जिल्हा बँकांना वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी जिल्हा बँकांनी ६ हजार ७९७ कोटी ७४ लाख ७८ हजार २९२ रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे. ३३ राष्ट्रीयीकृत आणि ३० जिल्हा बँकांतील ४६ लाख ५२ हजार ८१० कर्जखाती शासनाने मंजूर केली आहेत. त्यासाठी १४ हजार ५३६ कोटी ७४ लाख २ हजार २१३ रुपये इतकी रक्कम बँकांना दिली असून, बँकांनी १४ हजार ३८७ कोटी ७२ लाख ९९ हजार १५० रुपये इतकी कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे. 

मुंबई उपनगरातून लक्षणीय अर्ज
विशेष म्हणजे, सन २००८-०९ च्या कर्जमाफीप्रमाणे फडणवीस सरकारच्या कर्जमाफीसाठीसुद्धा मुंबई आणि उपनगरांतून कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कर्जमाफीसाठी मुंबई उपनगरातून १ हजार ६२० आणि मुंबई शहरातील २३ हजार ७१५ जणांनी अर्ज केल्याचे सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या
कारंजा रमजानपूर प्रकल्पास सुधारित...मुंबई : अकोला जिल्ह्याच्या खारपाण पट्ट्यातील...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
आढळा परिसरात दुष्काळी स्थितीअकोले, जि. नगर : नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत...
इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज...अकलूज, जि. सोलापूर : चालू वर्षी देशात साखरेचे...
धुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला...जळगाव : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊसपुणे ः दीर्घकालीन खंडानंतर पावसाने पुन्हा सुरवात...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
‘एमएसपी’ साखरेलाही पाहिजे ः दिलीपराव...लातूर ः उसाला, दुधाला, शेतमालाला हमी भाव मिळावा...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
जलसंधारण कामांसाठी तालुकानिहाय कार्यशाळावाशीम : जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...