अतिरिक्त दुधाचा प्रश्न हा सरकारचा बनाव ः डॉ. नवले

अकोले, जि. नगर ः बस स्थानक परिसरातील आंदोलनात सहभागी  डॉ. अजित नवले व इतर पदाधिकारी.
अकोले, जि. नगर ः बस स्थानक परिसरातील आंदोलनात सहभागी डॉ. अजित नवले व इतर पदाधिकारी.

नगर  ः अतिरिक्त दुधाचा प्रश्न हा सरकारचा बनाव आहे. दूध प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या माध्यमातून दूध संघ कोट्यवधी रुपये कमवत आहेत. दुधाच्या प्रश्नावर दूध पावडरीचा माध्यमातून तोडगा काढणे सहज शक्य आहे. परंतु हस्तक्षेप करून सरकार प्रश्न सोडवत नाही, असा आरोप भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला. 

अकोले तालुक्यातील सुगाव फाटा येथे आज दूध प्रश्नावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत लोकांना मोफत दूध वाटले. राजेंद्र भांगरे, विजय वाघचौरे, मछिंद्र धुमाळ, सुधाकर देशमुख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तीन तास चाललेल्या रास्ता रोकोत मोर्चेकाऱ्यांसमोर बोलताना नवले म्हणाले, सरकार दर न देणाऱ्या दूध संघावर कारवाईची भाषा करते. मात्र संघाना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी दूध कोणाला घालायचे याचे उत्तर सरकार देत नाही. एकीकडे कारवाईची आणि संघर्षाची सरकार भाषा करत असले, तरी २७ रुपये दराने दूध खरेदी करण्यासाठीची यंत्रणा उभी कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com