सरकारकडून शेतकऱ्यांसह सर्वांचीच फसवणूक

नेसरी, जि. कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित हल्लाबोल यात्रेत नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार.
नेसरी, जि. कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित हल्लाबोल यात्रेत नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार.

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : "भाजपने सत्तेवर येताना अनेक घोषणा केल्या. परंतु, साडेतीन वर्षे झाली तरी एकही घोषणा अंमलात नाही. शेतकरी, कष्टकरी, बरोजगार तरुण, महिला अशा सर्वच घटकांची भाजपकडून फसवणूक सुरू असल्याची टीका, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे केली.

भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे सुरू असलेल्या चौथ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनात मंगळवारी (ता.३) नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर टीकेचा भडीमार केला.

श्री. पवार म्हणाले, "शेतीमालाला भाव नाही. दुधाला दर नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. साखरधंदा रसातळाला नेला. शिक्षणाचा पुरता बोजवारा उडवला. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना या सरकारने डबघाईला आणले. काही निर्णयात तोटा सहन करून दानत दाखवण्याची हिंमत सरकारकडे असावी लागते. ती या सरकारकडे नाही. तसा प्रयत्नही होताना दिसत नाही. केवळ घोषणा देऊन वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरेच अशी दुतोंडी भूमिका सरकारची आहे. म्हणून राष्ट्रवादीने आंदोलन हाती घेतले आहे."

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक व त्यानंतर आतापर्यंत किमान दोन हजार आश्‍वासने दिली असतील. परंतु, त्यातील एकही घोषणा पूर्ण झाली नाही. घोषणा आणि प्रत्यक्ष कामातील भाजपचे अंतर फार मोठे आहे. या सरकारच्या काळात अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. यामुळे सामान्यांच्या मनातून हे सरकार उतरले आहे. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर यांची भाषणे झाली. 

या वेळी दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, चित्राताई वाघ, निवेदिता माने, ए. वाय. पाटील, संग्राम कोते-पाटील, अजिंक्‍य राणा-पाटील, बी. एन. पाटील, रामाप्पा करिगार, एम. जे. पाटील, राकेश पाटील, प्रमोद हिंदूराव, जयदेव गायकवाड, प्रकाश गजभीये, बनश्री चौगुले, सतीश पाटील, किरण कदम, रामदास कुराडे, शैलजा पाटील, अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली आदी उपस्थित होते. डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com