परभणीत शासकीय दूध संकलनात दुप्पट वाढ

परभणीत शासकीय दूध संकलनात दुप्पट वाढ
परभणीत शासकीय दूध संकलनात दुप्पट वाढ

परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात गतवर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. जिल्ह्यात दूध संघ नाहीत तसेच दरवाढ केल्यामुळे शासकीय दुग्ध शाळेतील दूध संकलनात यंदा मोठी वाढ झाली आहे. परंतु परभणी येथे दूध प्रक्रिया पदार्थ तयार करण्याची सुविधा नसल्यामुळे दररोज ३५ ते ३७ हजार लिटर दूध वारणानगर, मुंबई येथील आरे आणि वरळी येथे दूध भुकटी बनविण्यासाठी पाठवले जात आहे.

परभणी येथील शासकीय दुग्ध शाळेत परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांतील दूध उत्पादक संस्थांनी संकलित केलेले दूध जमा केले जाते. सध्या परभणी तालुक्यातील २८, पाथरी तालुक्यातील ३१, गंगाखेड तालुक्यातील ३७, हिंगोली जिल्ह्यातील ८ दूध उत्पादक सहकारी संस्थांनी पाथरी आणि गंगाखेड, हिंगोली येथील शीतकरण केंद्रावर जमा केलेले तसेच नांदेड येथील दूध शीतकरण केंद्रातील दूध परभणी येथील दुग्ध शाळेत पाश्चरायझेशन प्रक्रियेसाठी आणले जाते. 

या ठिकाणी दुधाचे पॅकिंग युनिट नाही तसेच उपपदार्थ निर्मितीसाठी आवश्यक सुविधा नाही. त्यामुळे दररोज ३५ ते ३७ हजार लिटर दूध वारणा नगर, मुंबई येथील आरे दूध वसाहत आणि वरळी येथील दुग्ध शाळेकडे टॅंकरद्वारे पाठविले जात आहे. एप्रिल अखेरपर्यंत परभणी तालुक्यातून म्हशीचे १९,४३८ लिटर आणि गायीचे ३ लाख १९ हजार ४३६ लिटर असे एकूण ३ लाख ३८ ८७४ लिटर दूध संकलन झाले.

पाथरी येथील शीतकरण केंद्रामध्ये गायीचे ४ लाख २४ हजार ६३५ लिटर, गंगाखेड येथील शीतकरण केंद्रामध्ये म्हशीचे २८,५१२ लिटर आणि गायीचे १ लाख ४९ हजार ७४४ लिटर असे एकूण १ लाख ७८ हजार २५६ लिटर, हिंगोली शीतकरण केंद्रामध्ये म्हशीचे १२ हजार १३० लिटर आणि गायीचे ८७ हजार ८२७ लिटर असे एकूण ९९ हजार ९५७ लिटर, नांदेड येथील दुध संकलन केंद्रामध्ये ८७ हजार ८६७ लिटर दूध संकलित करण्यात आले. 

तीन जिल्ह्यांतील एकूण ११ लाख ६८ हजार १०० लिटर दूध संकलन झाले. त्यापैकी वारणानगर येथे ९ लाख ६९ हजार ६०० लिटर, आरे मुंबई येथे २० हजार ५५० लिटर, वरळी मुंबई येथे १ लाख ७७ हजार ९५० लिटर दूध टॅंकरद्वारे पाठविण्यात आले.

तुलनात्मक दूध संकलन (एप्रिलअखेर) वर्षे                  दूध संकलन लिटर  २०१७                     ५५३४६४ २०१८                     ११६८१००  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com