agriculture news in Marathi, agrowon, 'Graduates' are also eligible for recruitment of agriculture employee | Agrowon

कृषिसेवक पदभरतीसाठी ‘पदवीधर’ही पात्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 मे 2018

अकोला  ः कृषी विभागातील कृषिसेवक पदासाठी राज्यपालांच्या नावे काढलेल्या अधिसूचनेत पदवी हा शब्द नसल्याने राज्यातील कृषी पदवीधरांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत सर्व ठिकाणांवरून विचारणा झाल्याने राज्य शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून कृषी सहायक पदावरील नियुक्तीसाठी कृषी पदवीधारकही पात्र अाहेत, असे म्हटले अाहे. यामुळे पदवीधरांना दिलासा मिळण्याची शक्यता अाहे.

अकोला  ः कृषी विभागातील कृषिसेवक पदासाठी राज्यपालांच्या नावे काढलेल्या अधिसूचनेत पदवी हा शब्द नसल्याने राज्यातील कृषी पदवीधरांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत सर्व ठिकाणांवरून विचारणा झाल्याने राज्य शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून कृषी सहायक पदावरील नियुक्तीसाठी कृषी पदवीधारकही पात्र अाहेत, असे म्हटले अाहे. यामुळे पदवीधरांना दिलासा मिळण्याची शक्यता अाहे.

राज्यपालांच्या नावे शासनाने २९ जानेवारीला काढलेल्या अधिसूचनेनुसार कृषी सहायक संवर्गाचे सेवाप्रवेश नियम सुधारीत केले अाहेत. यात ‘कृषी पदवी’ या व्याखेचा समावेश करण्यात अाला नाही. सोबतच शैक्षणिक अर्हतेमध्ये पदविका/तत्सम असा उल्लेख करण्यात अाला होता. यामुळे कृषी सहायक पदासाठी कृषी पदविधारक उमेदवार अर्ज करू शकतो किंवा नाही याची सर्वत्र विचारणा व्हायला लागली.

संघटनांनीही याबाबत अाक्षेप नोंदवले होते. याची दखल घेत शासनाच्या कक्ष अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन यांनी याबाबत पत्रक काढले. त्यानुसार सुधारित सेवाप्रवेश नियमांमध्ये कृषी सहायक पदावरील नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक अर्हता कृषी पदविका असून या पदावरील नियुक्तीसाठी कृषी पदवीधरांना वगळेले नाही. कृषी पदवीधारकही पात्र अाहेत, असे म्हटले. शासनाने ही सुधारणा केल्याने हजारो कृषी पदवीधरांचा जीव भांड्यात पडला अाहे.

‘त्या’ अडचणीबाबतही तोडगा हवा 
राज्यपालांच्या नावे प्रसिद्ध होणाऱ्या या अधिसूचनेतील प्रत्येक शब्दाचे महत्त्व असते. यावेळी सुधारणा करताना पदवी किंवा तत्सम शब्द नसल्याने सर्वत्र गोंधळ वाढला. कृषिसेवक पदाची पात्रता ‘पदविका व तत्सम’ अशी केल्याने अाणि सुधारणेत उल्लेख नसल्याने ‘पदवी’धारक गोंधळे होते. याबाबत सुधारीत अधिसूचना प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. तशी मागणी संघटना करीत होत्या. प्रत्यक्षात याअनुषंगाने कक्ष अधिकाऱ्यांनी पत्रक काढून हा गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न केलेला अाहे. पात्रतेचा मुद्दा यामुळे बराचसा स्पष्ट झाला अाहे. मात्र उपरोक्त अधिसूचनेत केलेल्या उर्वरीत बदलांमुळे असंख्य अडचणी निर्माण झालेल्या असल्याची भावना अाजही कार्यरत कृषी सहायक, पर्यवेक्षकांमध्ये राज्यात कायम असल्याचे संघटनांचे म्हणणे अाहे. शासनाच्या नवीन अधिसूचनेमुळे तयार होणाऱ्या अडचणीबाबत पदवीधरांकडून मोठ्या प्रमाणात अाक्षेप घेण्यात अालेले अाहेत. यावर तोडगा काढण्याची बाब शासन स्तरावर अद्याप प्रलंबित अाहे. शासनाने त्याबाबतही तातडीने धोरण जाहीर करण्याची मागणी केली जात अाहे.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
खानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळीजळगाव : खानदेशात मका, आगाप ज्वारीवर लष्करी अळीचा...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
नांदेड जिल्ह्यात तीन पिकांना विमानांदेड : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये पंतप्रधान...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...