उत्पादकता अादेशाअभावी हरभरा खरेदी रखडली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : या हंगामात उत्पादित झालेल्या हरभरा खरेदीसाठी शासनाकडून अाॅनलाइन नोंदणीचे अादेश देण्यात अाले. त्यानुसार सोमवार (ता. ५)पासून प्रत्यक्ष नोंदणी केली जात अाहे. परंतु हरभरा एकरी किती क्विंटल घ्यायचा हे निश्चित ठरवून, तसे अादेश जिल्हा यंत्रणांना मिळाले नसल्याने कुठेच खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती समोर अाली अाहे.   

या हंगामात खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर कमी असल्याने सातत्याने हमीभावाने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. शासनाने उशिराने का होईना; परंतु मार्च महिन्यात खरेदीची प्रक्रिया सुरू केली. यासाठी अाॅनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे सांगण्यात अाले.

तसेच नोंदणीनंतर खरेदी सुरू होईल असे सांगतिले जात अाहे. त्यानुसार शेतकरी हे नावनोंदणी करीत अाहेत. मात्र प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झालेली नाही. विशेष म्हणजे जिल्हा यंत्रणांकडून खरेदी करणाऱ्या सबएजन्ट संस्थांना खरेदीच्या अनुषंगाने कळविण्यात अालेले अाहे. हरभरा किती घ्यायचा हे निश्चित होणे अत्यावश्यक बाब बनली अाहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हरभऱ्याची हेक्टरी उत्पादकता निश्चित करून त्याबाबतचे अंतीम अादेश वरिष्ठ पातळीवरून जिल्हा यंत्रणांना मिळायचे अाहेत.

या अाठवड्यात अादेश येतील, असे सांगितले जात अाहे. या वर्षासाठी शासनाने हरभऱ्याचा हमीदर ४२५० रुपये निश्चित केलेला असून, त्यावर १५० रुपये बोनस दिला जाईल. असा एकूण ४४०० रुपये भाव शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला मिळणार अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com