agriculture news in marathi, agrowon, grape-pomegranate exhibition,solapur, Maharashtra | Agrowon

सोलापूरात आजपासून द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन
सुदर्शन सुतार
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सोलापूर : ''सकाळ-अॅग्रोवन''च्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे सोलापुरात आयोजन करण्यात आले असून, उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता शहरातील मध्यवर्ती अशा होम मैदानावर शेतकरी व मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे.

सोलापूर : ''सकाळ-अॅग्रोवन''च्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे सोलापुरात आयोजन करण्यात आले असून, उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता शहरातील मध्यवर्ती अशा होम मैदानावर शेतकरी व मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे.

शुक्रवार (ता.१५) ते रविवार (ता.१७) असे तीन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग आणि द्राक्ष, डाळिंबावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर परिसंवाद हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. गेल्या वर्षीही सोलापुरात हे प्रदर्शन भरले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यंदाही शुक्रवारपासून सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन शेतकऱ्यांना पाहता येईल.

ट्रॅक्‍टर, ब्लोअर, ड्रीप इरिगेशन, टिश्‍यूकल्चर, फर्टिलायझर्स, पेस्टिसाईडस्‌, बायोफर्टिलायझर, किडनाशके, वनस्पती वाढनियंत्रके, मोबाईल टेक्‍नॉलॉजी यासारख्या शेतीतल्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे नेणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा अविष्कार या प्रदर्शनात पाहायला मिळेल. त्याशिवाय शेतकरी आणि तज्ज्ञांची द्राक्ष-डाळिंबावर मार्गदर्शनपर परिसंवादही होतील.

शुक्रवारी (ता.१५) पहिल्या दिवशी उद्‍घाटनानंतर दुपारी दोन वाजता प्रगतिशील शेतकरी मारुती चव्हाण यांचे "द्राक्ष उत्पादनासाठी ऑक्‍टोबर छाटणीनंतरचे नियोजन'' या विषयावर तर दुपारी चार वाजता राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्सना शर्मा या ''डाळिंबावरील कीड-रोग व्यवस्थापना''वर बोलतील. शनिवारी (ता.१६) दुपारी बारा वाजता बारामती केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांचे ''डाळिंबाचे सेंद्रिय व जैविक पद्धतीने व्यवस्थापन व उत्पादनवाढीसाठी मधमाशी महत्त्व'' या विषयावर मार्गदर्शन होईल.

त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रगतिशील शेतकरी अतुल बाबर यांचे ''निर्यातक्षम द्राक्ष व्यवस्थापन'' या विषयावर मार्गदर्शन होईल; तर रविवारी (ता. १७) डॉ. विनय सुपे (सहायक संचालक, रिसर्च एनएआरपी, पुणे) यांचे ''दर्जेदार डाळिंब उत्पादन सुधारित तंत्र व तेलकट डाग रोगाचे नियंत्रण'' या विषयावर मार्गदर्शन होईल.

इतर अॅग्रो विशेष
बॅंकेच्या चकरा अन् कागदपत्रांच्या...धुळे ः मागील दोन - तीन महिन्यांपासून पीककर्जासाठी...
‘ई-नाम’मधील १४५ बाजार समित्यांसाठी हवेत...पुणे ः शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशातंर्गत...
सुमारे साठ एकरांवर ‘ड्रीप अॅटोमेशन’पाणी व खतांचा काटेकोर वापर करण्याबाबत अनेक शेतकरी...
भारताकडून अमेरिकेच्या हरभरा, तुरीच्या...नवी दिल्ली ः अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या...
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरीपुणे ः राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी (ता. २२)...
माॅन्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थितीपुणे : माॅन्सूनला राज्यातून पुढे सरकण्यास अनुकूल...
राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी...मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या...
धान्याला कीड लागताच सेन्सर देणार माहितीकऱ्हाड, जि. सातारा : साठवणूक केलेल्या ठिकाणी अथवा...
साखर निर्यातीचा कोटा ८० लाख टन करण्याची...कोल्हापूर : साखर निर्यातीची कोटा ८० लाख टन करावा...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
शेती म्हणजे तोटा हे सूत्र कधी बदलणार? शेती कायम तोट्यात कंटूर मार्करचे संशोधक व शेती...
‘ई-नाम’ची व्याप्ती सर्वांच्या...स्पर्धाक्षम, पारदर्शक व्यवहारातून शेतीमालास अधिक...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...
हास्य योगाद्वारे सरकारचा निषेधनागपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा अभिनव...
माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...