Agriculture news in Marathi, Agrowon, grapes and pomegranate expo, Nashik | Agrowon

नाशिकमध्ये आजपासून तंत्रज्ञानाचा जागर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

नाशिक : नाशिक जिल्हा द्राक्षे, डाळिंब, कांदा यासह भाजीपाला उत्पादनात देशात अग्रेसर आहे. नाशिक येथील राम सीता लॉन्स, औरंगाबाद रोड, नांदुर नाका येथे शुक्रवार (ता.१) ते रविवार (ता.३) सप्टेंबर दरम्यान ‘ॲग्रोवन’तर्फे ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७'' च्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जागर होत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जागरातून प्रात्यक्षिकांसह अत्याधुनिक यांत्रिकीकरण तसेच नवीन उपयुक्त निविष्ठांची ओळख होणार आहे. 

नाशिक : नाशिक जिल्हा द्राक्षे, डाळिंब, कांदा यासह भाजीपाला उत्पादनात देशात अग्रेसर आहे. नाशिक येथील राम सीता लॉन्स, औरंगाबाद रोड, नांदुर नाका येथे शुक्रवार (ता.१) ते रविवार (ता.३) सप्टेंबर दरम्यान ‘ॲग्रोवन’तर्फे ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७'' च्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जागर होत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जागरातून प्रात्यक्षिकांसह अत्याधुनिक यांत्रिकीकरण तसेच नवीन उपयुक्त निविष्ठांची ओळख होणार आहे. 

द्राक्ष, डाळिंब या पिकांनी शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले आहे. देशाच्या प्रगतीतही महत्त्वपूर्ण योगदान देणारी ही शेती गेल्या काही वर्षांपासून अत्यंत खडतर स्थितीतून वाटचाल करीत आहे. याही परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणारे तंत्रज्ञान हवे आहे. केवळ शेतकरी आणि कृषी उद्योजक केंद्रस्थानी ठेवून भरविण्यात येणाऱ्या ‘अॅग्रोवन’च्या या प्रदर्शनात सद्यस्थितीत आधार देणाऱ्या आणि शेतीचे भवितव्य दर्शविणाऱ्या दालनांची रेलचेल असणार आहे. या शिवाय या शेतीत तसेच शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या तज्ज्ञांची दिशादर्शक व्याख्यानेही फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 

प्रदर्शनात तज्ज्ञांचे मार्गदर्शन 
प्रदर्शनात तीन दिवस द्राक्ष डाळिंब क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे ज्ञानसत्रे होणार आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता.१) दुपारी २ वाजता श्री. अ. दाभोळकर प्रयोग परिवाराचे समन्वयक, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक वासुदेव काठे यांचे ‘‘दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी फळ छाटणीनंतरचे नियोजन'' या विषयावर मार्गदर्शन होईल. शनिवारी (ता.२) दुपारी १२ वाजता प्रा. तुषार उगले यांचे ‘‘रासायनिक अंशमुक्त द्राक्ष बागेचे व्यवस्थापन’’ या विषयांवर मार्गदर्शन करतील. दुपारी ३ वाजता द्राक्ष व डाळिंब शेतीतील प्रयोगशील शेतकरी खंडू शेवाळे हे ‘‘डाळिंब शेतीतील समस्या व उपाय’’ या विषयावर अनुभव कथन व मार्गदर्शन करतील. रविवारी (ता.३) प्रसिद्ध डाळिंब शास्त्रज्ञ डॉ. विनय सुपे हे ‘‘दर्जेदार डाळिंब उत्पादनाचे सुधारित तंत्र आणि तेलकट डाग रोग नियंत्रणासाठीचे उपाय’’ या विषयावर मार्गदर्शन करतील. 

आज होणार शेतकऱ्यांच्या हस्ते उदघाटन 
शुक्रवारी (ता. १) सकाळी १० वाजता प्रदर्शनात भेट देण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होईल. प्रदर्शनात विशेषत्वाने द्राक्ष व डाळिंबासाठी लागणारी पायाभूत सामग्री, टिश्‍यू कल्चरपासून संवर्धित केलेली रोपे व आधुनिक रोपवाटिका तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान, ट्रॅक्‍टर, अत्याधुनिक फवारणी यंत्रे, कीडनाशके, जैविक खते, मल्चिंग पेपर, वनस्पती वाढ नियंत्रके, मोबाईल टेक्‍नॉलॉजी आदी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह अनुभवायला मिळणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...
प्लॅस्टिक, थर्माकोलच्या उत्पादनांवर बंदीमुंबई : राज्यात प्लॅस्टिक; तसेच थर्माकोलपासून...
जिवाशी खेळ थांबवाराज्यातील भेसळयुक्त दूधविक्रीचा प्रश्न चालू...
अवकाशाला गवसणी घालणारा शास्त्रज्ञस्टीफन हॉकिंग २००१च्या नवीन वर्षाच्या ...