द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनास उत्साहात प्रारंभ
ज्ञानेश उगले
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

नाशिक : येथील राम सीता लॉन्स मध्ये ‘ॲग्रोवन’तर्फे आयोजित ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७’ला शुक्रवारी (ता.१) उत्साहात प्रारंभ झाला. यंत्रे, ट्रॅक्‍टर्स, खते, बियाणे, सिंचन, कीड नियंत्रण या शेतीतील विविध उत्पादनांच्या दालनांची रेलचेल असलेले हे प्रदर्शन रविवार (ता.३) पर्यंत चालणार आहे. शुक्रवारी सकाळपासून नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांचा ओघ सुरू झाला. सिन्नर तालुक्‍यातील कोनांबे येथील ज्येष्ठ शेतकरी शामराव कचरू डावरे यांच्यासह जोगलटेंभी (ता. सिन्नर) येथील बाळकृष्ण जगन्नाथ कमोद, रामदास पांडुरंग भास्कर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. 

नाशिक : येथील राम सीता लॉन्स मध्ये ‘ॲग्रोवन’तर्फे आयोजित ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७’ला शुक्रवारी (ता.१) उत्साहात प्रारंभ झाला. यंत्रे, ट्रॅक्‍टर्स, खते, बियाणे, सिंचन, कीड नियंत्रण या शेतीतील विविध उत्पादनांच्या दालनांची रेलचेल असलेले हे प्रदर्शन रविवार (ता.३) पर्यंत चालणार आहे. शुक्रवारी सकाळपासून नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांचा ओघ सुरू झाला. सिन्नर तालुक्‍यातील कोनांबे येथील ज्येष्ठ शेतकरी शामराव कचरू डावरे यांच्यासह जोगलटेंभी (ता. सिन्नर) येथील बाळकृष्ण जगन्नाथ कमोद, रामदास पांडुरंग भास्कर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. 

या वेळी विभागीय द्राक्ष व कांदा संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. जितेंद्र ढेमरे, गहू संशोधन केंद्र निफाडचे कवक शास्त्रज्ञ डॉ. बबनराव इल्हे, मृदशास्त्रज्ञ डॉ. अविनाश गोसावी, कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, फिनोलेक्‍स कंपनीचे उपसरव्यवस्थापक संतोष तळेले, पिंगळे पब्लिसिटीचे मोतीराम पिंगळे उपस्थित होते.  

प्रात्यक्षिके ठरलीत आकर्षण 
अत्याधुनिक ट्रॅक्‍टर्ससह स्वयंचलीत यंत्राची प्रात्यक्षिके ही शेतकऱ्यांच्या आकर्षणाची केंद्रे ठरली. या शिवाय छोट्या आकारातील संयंत्रे, अवजारे, सूक्ष्म सिंचन, विद्राव्य खते, बियाणे, कृषी साहित्य प्रकाशने या विविध स्टॉलवरील उत्पादनांना पहिल्याच दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

खूप उपयोगी ठरणारे प्रदर्शन 
सिन्नर तालुक्‍यातील कोनांबे येथून सकाळी लवकर प्रदर्शन पाहण्याच्या ओढीने आलेले ज्येष्ठ शेतकरी शामराव डावरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. श्री. डावरे म्हणाले, ‘‘दरवर्षी मी ‘ॲग्रोवन’च्या द्राक्ष डाळिंब प्रदर्शनास पहिल्याच दिवशी येतो. या प्रदर्शनातून मिळणारी तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष शेतीत खूप उपयोगी ठरते. माझी ३५ एकर शेती असून त्यात द्राक्षे, कांदे, लसूण, ऊस, भात ही पिके घेतो. यंदा जास्त पावसाने शेतीचे नियोजन कोलमडले आहे. खते, किडनाशके, मजुरी या वरील उत्पादन खर्च वाढला आहे. हे आव्हान असले तरी तंत्रशुद्ध शेती केल्यास या आव्हानांवर मात करणे शक्‍य आहे. येत्या काळात शेतीत पीक बदल करावयाचा आहे. त्या उद्देशाने माहिती मिळविण्याच्या अपेक्षेने ‘ॲग्रोवन’च्या द्राक्ष डाळिंब प्रदर्शनास आलो आहे. इथे फार महत्त्वाची माहिती मिळाली.’’
 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात ३५ ते ४० हजार टन खते... जळगाव : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात खतांचा मुबलक...
सोलापूर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने...
उद्याेग जननी कमल पुरस्कारांचे वितरणपुणे : महिला बचत गटांनी आणि महिला शेतकऱ्यांनी...
देशातील खरीप पीक १०४९ लाख हेक्टरवर नवी दिल्ली ः देशातील खरीप पीक क्षेत्र गेल्या...
देशातील ९१ धरणांत ५९ टक्के पाणीसाठा नवी दिल्ली ः देशातील धरणांत ५९ टक्के पाणीसाठा ...
नगर, नाशिक जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक... नाशिक : गत सप्ताहात राज्यातील टोमॅटो उत्पादक...
साताऱ्यात वांगी, टोमॅटोची आवक वाढली सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नागपुरात सरबती गहू २२०० ते २६०० रुपये... नागपूर ः येथील कळमना बाजार समितीत गत...
पितृपंधरवड्यामुळे सोलापुरात गवार, भेंडी... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
धुळे, जळगाव जिल्ह्यातील हंगामी... जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यांत हंगामी पैसेवारी...
कोल्हापूर बाजार समितीत फूल बाजार सुरू कोल्हापूर : येथील बाजार समितीत सोमवार (ता. १८)...
सातारा जिल्ह्यात ६५७ शेततळ्यांची कामे... सातारा : मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा...
राज्यात आज पावसाचा अंदाजपुणे ः काेकण आणि गाेव्यात मंगळवारी (ता. १९) तुरळक...
डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव सांगली : जिल्ह्यात मृग हंगामातील डाळिंबाचा बहर...
दर्जेदार डाळिंबासाठी जमिनीच्या...सोलापूर : डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमीन...
उत्पादन खर्चात मोठी घट, पोल्ट्रीचा ‘...गेल्या महिनाभरात पोल्ट्री खाद्यासाठी लागणाऱ्या...
पुणे बाजार समितीत घाणीचे साम्राज्यपुणे : अाशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार...
शाहु महाराज, अंबाबाईचे दर्शन घेवुन... कऱ्हाड - घटस्थापनेदिवशी 21...
शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने शेती करावी :...परभणी : सरकार तसेच कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या...
‘गोकुळ’च्या अध्यक्ष बदलाच्या हालचालीकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ)...