ॲग्रोवन द्राक्ष डाळिंब प्रदर्शनाचा शेवटचा दिवस
ज्ञानेश उगले
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नाशिक : आव्हानात्मक परिस्थितीतही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन’तर्फे आयोजित ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७’ उपयुक्त ठरले आहे. शेतीच्या विविध तंत्रज्ञानांचा अविष्कार दिसत असल्याने प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी, शनिवारी (ता. २) शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज, रविवारी (ता.३) या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

नाशिक : आव्हानात्मक परिस्थितीतही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन’तर्फे आयोजित ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७’ उपयुक्त ठरले आहे. शेतीच्या विविध तंत्रज्ञानांचा अविष्कार दिसत असल्याने प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी, शनिवारी (ता. २) शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज, रविवारी (ता.३) या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

 ‘ॲग्रोवन’च्या प्रदर्शनामुळे मागील तीन दिवसांपासून राम सीता लॉन्स, नांदूर नाका परिसर शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. औरंगाबाद, नगर, सांगली, कोल्हापूर या भागातूनही शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला हजेरी लावली. नामांकित कंपन्यांनी तयार केलेल्या छोट्या ट्रॅक्‍टर्सचे सादरीकरण हे सर्वाधिक शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले आहे. जॉन डियर ट्रॅक्‍टरचा छोटा द्राक्ष व डाळिंब बागेत प्रभावी काम करणारा ट्रक्‍टर आकर्षण ठरत आहे. मॅसी फर्ग्युसन, फोर्स कंपन्यांच्या ट्रॅक्‍टर्सबाबत शेतकऱ्यांनी विशेष उत्सुकता दाखवित तंत्रज्ञान बारकाईने समजून घेतले.

सिंचन तंत्रज्ञानावरील फिनोलेक्‍स प्लॅसॉन यासारख्या कंपन्यांच्या दालनात अत्याधुनिक माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. तंत्रज्ञानात गोदावरी ॲग्रो प्रॉडक्‍ट्स, युनिक ॲग्रो केअर यांच्यासह अनुष्का ब्लोअर्सचे सुमी डस्टर यांची प्रात्यक्षिके आकर्षण ठरली. या वेळी या उत्पादनांसाठी शेतकऱ्यांनी बुकिंग करण्यावर भर दिला. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन तंत्र मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढविणारा ठरला असल्याचे कृषी उद्योजकांनी सांगितले. ठिबक सिंचनाची वायरलेस ऑटोमेशन, फर्टिगेशन, प्रेशर कॉम्प्रेंसेंटिव्ह नॉन ड्रेम बोल्ट ड्रीप सिस्टिमचे फायदे, खताची व पाण्याची बचत व उत्पादन वाढीसंदर्भातील माहिती जाणून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला.

तांत्रिक सत्रांना प्रतिसाद 
‘‘रसायन अवशेषमुक्त द्राक्ष उत्पादन’’ या विषयावर प्रा. तुषार उगले यांनी शनिवारी (ता. २) पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले. भुयाणे (ता. सटाणा) येथील प्रयोगशील डाळिंब व द्राक्ष उत्पादक खंडू शेवाळे यांनी ‘‘डाळिंब शेतीतील समस्या व उपाय’’ या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हाभरातील तरुण शेतकऱ्यांनी या तांत्रिक सत्रांनी हजेरी लावीत शंका निरसन होतांना आधुनिक तंत्रज्ञान मार्गदर्शनाचा लाभ घेतला. 

द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात आज (ता. ३) होणारे व्याख्यान 
विषय : तेलकट डाग रोगमुक्त डाळिंब बाग व्यवस्थापन
तज्ज्ञ : डॉ. विनय सुपे
वेळ : दुपारी १२ ते २

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा :...जळगाव : भाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे...
सहकार विकास महामंडळ विसर्जित करण्याची...पुणे ः सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करून...
कांदा दर अजून सव्वा महिना टिकून राहतील...नाशिक : लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता.25)...
मत्स्य़पालन ठरले फायदेशीर आसेगाव (जि. वाशिम) येथील खानझोडे बंधू यांनी...
कर्जमाफी अर्जांची साठ टक्के छाननी झाली...मुंबई ः शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन...
फवारणी यंत्राच्या कल्पक निर्मितीतून वेळ...एकीकडे शेतीत यांत्रिकीकरण वाढत आहे, तर दुसरीकडे...
सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान हवामान :  तीनही हंगामात लागवड शक्‍य...
बाजार समित्या रद्द केल्यास किंमत मोजावी...मुंबई ः सरकारची धोरणे रोज बदलत आहेत. बाजार...
नाशिक जिल्ह्यातील १६ धरणे तुडुंब नाशिक  : जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह,...
मूग, उडीद पीककापणीची माहिती २८ पर्यंत...मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मूग आणि...
गरज पडल्यास अाणखी साखर अायात : केंद्रीय...नवी दिल्ली: देशात जर साखरेची गरज पडल्यास अाणखी...
जळगाव जिल्ह्यात ‘कृषी’ संबंधित ३९९ पदे...जळगाव ः जिल्ह्यात राज्य शासनांतर्गत असलेल्या...
भातावर करपा, तांबेरा, पाने गुंडाळणारी...कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असला...
पूर्व विदर्भात धानावर गादमाशी,...नागपूर ः पूर्व विदर्भात यंदा पावसाअभावी ८० टक्‍के...
भेंडी पिकात कमीत कमी निविष्ठा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
मॉन्सून २८ पासून परतीच्या मार्गावरपुणे : सध्या राजस्थानच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
रब्बी हंगामासाठी सुधारित अवजारेरब्बी हंगामाचा विचार करता मजुरांची उपलब्धता व...
ऊस उत्पादकांच्या खिशाला ३६१ कोटींची...सोलापूर ः राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडूनही भाग...
कर्जमाफीतील पाचर ऊस उत्पादकांच्या मुळावरमुंबई : कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे नियमित...
लिंगभेद मानण्याची मनोवृत्ती बदलावीपुणे ः ‘मुलगाच पाहिजे’चा कुटुंबातून होणारा...