agriculture news in Marathi, agrowon, 'GST' mention is mandatory for fertilizer dealers | Agrowon

खत विक्रेत्यांना 'जीएसटी'चा उल्लेख अनिवार्य
राजकुमार चौगुले
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कोल्हापूर : केंद्रीय खत व रसायन मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या डी.बी.टी. योजनेत आता नवे बदल झाले आहेत. देशातील प्रत्येक खत विक्रेत्यास आता पॉस मशिनद्वारे रासायनिक खतांची विक्री करताना 'जीएसटी' (वस्तू आणि सेवा कर)चा उल्लेख करावा लागणार आहे. 

कोल्हापूर : केंद्रीय खत व रसायन मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या डी.बी.टी. योजनेत आता नवे बदल झाले आहेत. देशातील प्रत्येक खत विक्रेत्यास आता पॉस मशिनद्वारे रासायनिक खतांची विक्री करताना 'जीएसटी' (वस्तू आणि सेवा कर)चा उल्लेख करावा लागणार आहे. 

शेतकरी खत खरेदीसाठी जेव्हा खताच्या दुकानातून खत विकत घेतो, त्या वेळी त्याला पॉस मशिनवरून आधार क्रमांक सांगावा लागतो. त्यानंतर खताची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना खरेदीची पावती मिळते. इतके दिवस या पावतीवर जीएसटीचा उल्लेख नव्हता. आता या पावतीवर खताच्या विक्रीनंतर त्याच्या जीएसटी विक्रेत्याची माहिती, खत खरेदीदाराचे नाव, पत्ता या माहितीचा उल्लेख असेल.

अनेक खत विक्रेत्यांकडे जीएसटी क्रमांक उपलब्ध नाही. याआधी जीएसटी क्रमांक नसले तरीदेखील पॉस मशिनवर खतांची विक्री होत होती. तसेच पॉस मशिनमध्ये जीएसटीची नोंद होत नसे. परंतु आता यात सुधारणा झाल्यानंतर खत विक्रेत्यांना राज्य सरकारच्या कर विभागाकडून हा क्रमांक मिळवावा लागणार आहे. या प्रणालीद्वारे खत विक्रीचे व्यवहार पारदर्शक होतील, असे सूत्रांनी सांगितले.
 

आठ दिवसांपासून इतर राज्यांत प्रारंभ 

आठ दिवसांपासून या प्रणालीस सुरवात करण्यात आली आहे. नवी दिल्ली, पद्दुचेरी, आसाम, मिझोराम, मेघालय, नागलँड, मणिपूर, त्रिपुरा, दादरा नगर हवेली, दीव दमण येथे ही प्रणाली सुरू केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...