agriculture news in Marathi, agrowon, Harvesting rate of turmeric increased in Hingoli | Agrowon

हिंगोलीत हळद काढणीचे दर वाढले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

हिंगोली : अनियमित, अपुऱ्या पावसाचा जिल्ह्यातील हळद उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक भागांत हळद उत्पादनात घट येत आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

हिंगोली : अनियमित, अपुऱ्या पावसाचा जिल्ह्यातील हळद उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक भागांत हळद उत्पादनात घट येत आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

सर्वच तालुक्यांत हळदीच्या वाढीच्या अवस्थेत पडलेला पावसाच्या खंडामुळे तसेच सिंचनासाठी पाणी कमी पडल्यामुळे हळद उत्पादनात घट येत आहे. जिल्ह्यात हळद काढणी हंगाम सुरू आहे. सरंक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या काही भागांत दरवर्षीप्रमाणे सरासरी हळदीचे उत्पादन मिळत आहे. परंतु गतवर्षीच्या तुलनेत एकरी हळद काढणीच्या दरात १५०० ते ३००० रुपयांची वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. 

यंदा हळद काढणीसाठी एकरी ७५०० ते १०,००० रुपयांपर्यंत मजुरी घेतली जात आहे. सद्यःस्थितीत हळदीचे दर ५२०० ते ७६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. येत्या काळात ते स्थिर राहतील की नाही याची शाश्वती नाही. यंदा एकंदरीत उत्पादन खर्च वाढल्यामुळे हळद उत्पादकांचा तोटा वाढला आहे.

उत्पादन सरासरी एवढे मिळत आहे. परंतु काढणीचा खर्च वाढल्यामुळे तोटा वाढत चालला आहे, असे तेलगाव (ता. वसमत) येथील शेतकरी बाळासाहेब राऊत यांनी सांगितले. कमी पावसामुळे हळदीच्या उत्पादनात घट आली आहे. एकरी ५० हजार रुपये खर्च झाला आहे, असे केळी (ता. औंढा) येथील शेतकरी अनंतराव कावरे यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...