agriculture news in marathi, agrowon, high temperature affect banana planting, jalgaon | Agrowon

जळगाव जिल्ह्यात तापमानवाढीमुळे केळी लागवड लांबली
चंद्रकांत जाधव
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

सध्या केळी लागवडीला उष्णता व आर्द्रता असे प्रतिकूल वातावरण बाधा पोचवित आहे. परंतु दिवाळीपूर्वी लागवड सुरू होईल. 
- नरेश नवाल, केळी उत्पादक, नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव)

जळगाव ः जिल्ह्यात कांदेबाग केळी लागवड काही भागांत झाली असली तरी चोपडा, जळगाव भागांत कांदेबाग लागवडीला अद्याप सुरवात झालेली नाही. अर्थातच सध्या उष्ण व आर्द्रतायुक्त वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी कांदेबाग लागवड टाळणे पसंत केले आहे. 

दिवाळीपूर्वी लागवड करण्याचे नियोजन अनेक शेतकऱ्यांनी केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात चोपडा व जळगाव तालुक्‍यांत सर्वाधिक कांदेबागांची लागवड केली जाते. यावल, रावेर व मुक्ताईनगर तालुक्‍यांत फारशी कांदेबाग लागवड केली जात नाही. यावल, रावेरात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे व जून महिन्यांत केळीची लागवड केली जाते. 

चोपडा, जळगाव भागांत जवळपास चार हजार हेक्‍टरवर कांदेबागांची लागवड केली जाते. त्यासाठी कंदांना पसंती दिली जाते. ही लागवड दरवर्षी सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होते. परंतु यंदा हवा तसा पाऊस सप्टेंबरमध्ये झाला नाही. यासोबतच उष्णता अधिक आहे. खेळती हवा नाही. त्यामुळे केळीची लागवड केली तरी तिच्या अंकुरणाला बाधा पोचू शकते, अशी स्थिती आहे. 

कंद सडण्याची भीती
उष्णतेसह प्रतिकूल वातावरणात कंदांचे अंकुरण व्यवस्थित होत नाही, यातच खोड सडण्याची शक्‍यताही असते. त्यामुळे नांग्याही अधिक भराव्या लागतात. नांग्या अधिक भराव्या लागल्या तर पुढे केळी एकाच वेळी निसवत नाही. बाग कापणीस उशीर होतो, असे केळी उत्पादक शेतकरी सत्त्वशील पाटील (कठोरा, जि. जळगाव) यांनी सांगितले.

सध्या केळीची लागवड शेतकरी टाळत असले, तरी वाफसा चांगला असल्याने शेतांची नांगरणी, शेत भुसभुशीत करणे आदी कामे शेतकरी उरकून घेत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर लागवडीसाठी सऱ्यादेखील पाडून घेतल्या आहेत. 

पाचोरा, तोंडापूरच्या कंदांना पसंती
पाचोरा, कजगाव (ता. भडगाव) येथील नवती केळी बागांची कापणी अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच तोंडापूर (ता. जामनेर) येथील नवती केळी बागांमध्येही कंद उपलब्ध होऊ लागले आहेत. तापीकाठावरील गावांमध्ये तोंडापूर, कजगाव येथील केळीचे कंद चांगले अंकुरतात व पुढे बहरतात, असे शेतकरी मानतात.

त्यामुळे पाचोरा, जामनेर भागांत कंद काढण्यासंबंधी जळगाव, चोपडा भागांतील शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेतली आहे. त्यासाठी आगाऊ बेणे कंद खोदणाऱ्या मजुरांना दिले जात असल्याची माहिती आहे. काही शेतकऱ्यांनी तर कंद आपल्या शेतात आणून ते केळीची कोरडी पाने, गोणपाटाने झाकून ठेवली आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
होय, आम्हीच खरे लाभार्थी!राज्यभर झालेल्या मृद संधारणाच्या अनेक कामांवर...
शेतीमाल हमीभाव : एक सापळासरकारने शेतकऱ्यांपुढे लटकवलेले हमीभावाचे एक गाजरच...
थंडी पुन्हा परतण्याची चिन्हेपुणे : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गायब झालेली...
कापूस उत्पादकांना एकरी २५ हजारांची मदत...नागपूर : बोंडअळीमुळे कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे...
कारखान्यांपुढे शॉर्ट मार्जिनचे संकटकोल्हापूर ः गेल्या तीन महिन्यांपासून साखरेच्या...
मावळातील शेतकऱ्यांची इंद्रायणी भाताला...कामशेत, जि. पुणे ः मावळ तालुक्‍याची ओळख असलेला...
"स्वामिनाथन'बाबत पुन्हा सर्वोच्च...पुणे : शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के...
अन्नसुरक्षा मुद्दाच भारतासाठी महत्वाचा ब्युनाॅर्स अायर्स, अर्जेंटिना : येथे होत असलेल्या...
कर्जमाफी, यवतमाळ विषबाधा,...नागपूर : ऑनलाइन कर्जमाफीतील घोळ, पाच...
अवघ्या ३०० रुपयांत बनविले हरभरा शेंडे...एक एकर हरभरा खुडणीसाठी पाच ते सहा मजुरांची...
सोयाबीनच्या दर्जेदार बीजोत्पादनासाठी...महाराष्ट्राचे प्रमुख पीक म्हणून कापूस व सोयाबीनचा...
कोणताही पक्ष, सरकार, शेतकऱ्यांना न्याय...शेतकरी प्रश्‍नांबाबत रघुनाथदादांची खंत आजपासून...
ट्रेलर्स ट्रॅक्‍टरला स्वयंचलित ब्रेक...सातारा : ॲग्रिकल्चरल ट्रेलर्स ट्रॅक्‍टर्सला...
कापूस उत्पादकांकडून बोनसची मागणीनागपूर : कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप...
‘माफसू’ची कुलगरू निवड प्रक्रिया २४...नागपूर ः महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान...
विदर्भात काही ठिकाणी बुधवारी पावसाचा...पुणे  ः बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा...
कीटकनाशक प्रयोगशाळांमध्ये विश्लेषकांची...पुणे : कीटकनाशकांची विक्री वाढत असताना राज्यातील...
भडगावला अडतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची...जळगाव ः बाजार समितीत अडत वसुली बंदचा निर्णय होऊन...
सीताफळाला फळमाशीचा डंखसोलापूर ः कोरडवाहू शेतकऱ्यांचा आधार ठरू पाहणाऱ्या...
शेतीमध्येही गिरविले आधुनिकतेचे धडेघाटकोपर (मुंबई) येथील तानाजी मोहिते यांनी...