agriculture news in Marathi, agrowon, Horticulture area in danger zone | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या माना
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

यवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचा प्रश्‍न उभा झाला आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. पाण्याअभावी फळबागांनी माना टाकायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.

मागील पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला. परिणामी, जमिनीतील पाणीपातळी म्हणावी तशी वाढली नाही. प्रकल्पही पूर्णक्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे हिवाळ्यात जिल्ह्यावरील टंचाईचे ढग गडद झाले होते. यानंतर शासन, प्रशासनाकडून म्हणावे तशी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यांचा फटका नागरिकांना बसत आहे. 

यवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचा प्रश्‍न उभा झाला आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. पाण्याअभावी फळबागांनी माना टाकायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.

मागील पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला. परिणामी, जमिनीतील पाणीपातळी म्हणावी तशी वाढली नाही. प्रकल्पही पूर्णक्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे हिवाळ्यात जिल्ह्यावरील टंचाईचे ढग गडद झाले होते. यानंतर शासन, प्रशासनाकडून म्हणावे तशी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यांचा फटका नागरिकांना बसत आहे. 

अनेक भागांत पाणी नसल्याने नागरिकांवर मोठे संकट ओढवले आहे. याशिवाय पाणीटंचाईचे संकट शेतकऱ्यांवरही आले आहे. खरीप व रब्बी हंगामांत फटका बसल्यानंतर ओलित असलेल्या शेतकऱ्यांची भिस्त उन्हाळी पिकांवर होती. मात्र, त्यांनाही आता टंचाईचे चटके बसू लागले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबागाची लागवड करण्यात आली आहे. त्यात संत्रा, मोसंबी, पपई, टरबूज, डांगर आदींचा समावेश आहे. मात्र, आता या पिकांनाही पाणीटंचाईचा फटका बसू लागला असून, फळबागांनी माना टाकायला सुरवात केली आहे. परिणामी, फळांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाचा फटका बसत आहे.

शेतकऱ्यांची आशा मावळली
उत्तरवाढोणा शेतशिवारात यमुना नाईक यांची शेती आहे. त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत दोन हेक्‍टरवर संत्रा लागवड केली. यंदा पाणीटंचाईचा या बागाला फटका बसला असून, संत्र्यांची झाडे वाळली आहेत. खरीप व रब्बी हंगाम हातून गेल्यानंतर फळबागांवर शेतकऱ्यांची आशा होती. मात्र, पाण्याअभावी आता तीही मावळली असल्याचे यमुना नाईक यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...