मी भाजपचा क्रियाशील कार्यकर्ता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  : रयत क्रांती संघटना हा पक्ष नाही, मी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचा क्रियाशील कार्यकता आहे. माझा भाजप प्रवेश झाला आहे, असा खळबळजनक खुलासा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. तसेच रयत संघटना लोकहित काम करणारी संघटना असल्याची कबुली या वेळी सदाभाऊ यांनी पत्रकारांशी बोलत दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी ही प्रक्रिया उरकली होती. "गळ्यात हार घालून सोहळा करण्याची गरज नाही'' असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सदाभाऊ खोत यांची ओळख आता भाजपचे नेते अशी करावी लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यसभेसाठी अर्ज करताना ते पक्ष कोणता सांगणार, असा मुद्दा चर्चेला आला होता. कारण, विधान परिषद किंवा राज्यसभेला ज्या पक्षाकडून अर्ज दाखल करायचा त्याचे सभासद असणे गरजेचे असते. त्याच मुद्द्यावर आज सदाभाऊंना छेडले असता त्यांनी हा मोठा खुलासा केला.

सदाभाऊ छातीला रयत क्रांती संघटनेचा बिल्ला लावतात आणि गळ्यात भाजपचे उपरणे घालतात, मात्र त्यांनी भाजप प्रवेश केला नाही, असाच कार्यकर्त्यांसह सर्वांचा समज होता. तो आज दूर झाला.

सदाभाऊ म्हणाले, "मी भाजपचा क्रीयाशील सभासद आहे. विधान परिषदेसाठी ए.बी. फॉर्म भरतानाच मी भाजप प्रवेश केला आहे.' एकाच वेळी भाजप व रयत क्रांती संघटना या दोन्ही ठिकाणी सभासद कसे राहता येईल, या प्रश्‍नावर ते म्हणाले, "रयत क्रांती संघटना हा राजकीय पक्ष नव्हे. लोकहितासाठी काम करणारी ती संघटना आहे. त्यामुळे मी भाजपचा असण्याचा आणि संघटनेचा तांत्रिक अडचणीचा विषय येत नाही.'

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com