agriculture news in Marathi, agrowon, i dont want to Return in Cabinet | Agrowon

मंत्रिमंडळात परतण्याची माझीच इच्छा नाही
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018

मुंबई : माझ्या अडचणीच्या काळात पक्ष माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे. भाजपचा त्याग करणे हे माझ्या स्वप्नातही येऊ शकत नाही. मी कदापि भाजप सोडणार नाही आणि मला या मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नसल्याचे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.  

मुंबई : माझ्या अडचणीच्या काळात पक्ष माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे. भाजपचा त्याग करणे हे माझ्या स्वप्नातही येऊ शकत नाही. मी कदापि भाजप सोडणार नाही आणि मला या मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नसल्याचे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.  

खडसे यांनी गेल्या चार वर्षांत ज्या काही घडामोडी घडल्या त्यावर अतिशय मोकळेपणाने ‘पीटीआय’शी संवाद साधला. भोसरी जमीन प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्याने खडसे पुन्हा मंत्रिमंडळात परणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, खडसे यांनीच तशी शक्‍यता फेटाळून लावली. भोसरी प्रकरण, दाऊद प्रकरण आदी मुद्द्यांना स्पर्श करतानाच ते म्हणाले, ‘‘एक वर्षाने राज्यात विधानसभेची निवडणूक आहे, तसेच स्थानिक निवडणुकाही होत आहेत, त्यामुळे मला त्यादृष्टीने तयारी करायची आहे, त्यामुळे मला आता मंत्रिमंडळात परण्याची कोणतीही इच्छा नाही.’’ खूप काम करायचे असल्याचे श्री. खडसे म्हणाले. 

भोसरी प्रकणात क्‍लीनचीट मिळाल्यानंतर त्यांच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रियाही झाली आहे. माझी निर्दोष सुटका झाल्याने मला आनंद झाला आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘‘ज्यांनी आरोप केला ते आता उघड्यावर पडले आहेत.भविष्यात कोणते राजकारण आपण करणार आहात याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘‘सर्वच पक्षांतील नेत्यांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. अनेक पक्षांत माझे जिवलग मित्र असले तरी मी भाजपचा आहे आणि भाजपचाच राहीन. पक्ष सोडण्याबाबत माझ्या मनात कोणताही विचार नाही. मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भाजपने मला भरपूर दिले आहे. पक्षामुळेच मी घडलो आहे.’’ 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...