agriculture news in Marathi, agrowon, If the BJP comes to power again Democracy risk | Agrowon

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाहीला धोका
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018

अकोला : राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते बघता भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या देशात लोकशाहीचा गळा घोटला जाईल. ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, अशी इशारा वजा भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (ता. २५) अकोला येथे व्यक्त केली. 

अकोला : राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते बघता भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या देशात लोकशाहीचा गळा घोटला जाईल. ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, अशी इशारा वजा भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (ता. २५) अकोला येथे व्यक्त केली. 

देशात सामाजिक, आर्थिक अराजकतेचे वातावरण आहे. लोकसभेत बहुमत आहे, उद्या राज्यसभेतही बहुमत झाल्यावर या देशाची घटना बदलून लोकशाहीचा गळा घोटला जाईल. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत आल्यास ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल. देश हुकूमशाहीच्या खायीत लोटला जाईल, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

विधानसभेत सभापतींविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर १४ दिवसांत निर्णय येणे आणि त्यानंतर सात दिवसांत सभागृहात चर्चा घेऊन मतदान घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, बहुमत असलेल्या भाजप- शिवसेना युतीच्या सरकारने चर्चाच नाकारली. उलट विधानसभेच्या कामकाजाच्या सूचीत विषय नसताना मुख्यमंत्री स्वतः सभागृहात विश्‍वास ठराव मांडतात आणि कोणतीही चर्चा न करता तो पारित करून अधिवेशन गुंडाळले जाते, ही हुकूमशाहीची सुरवात नाही तर काय, असा प्रश्‍नही चव्हाण यांनी उपस्थितांना केला. 

राज्यातील ३२ हजारपैकी १० टक्के उद्योग चार वर्षांत बंद पडले. भाजप सत्तेत आला तेव्हा २४ लाख ४७ हजार नोकऱ्या होत्या, चार वर्षांनंतर ही संख्या २० लाखांवर आली आहे. देशात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत. अशा बँकांना वाचविण्यासाठी सर्वसामान्यांच्या खात्यातील पैसे बँकेच्या भागभांडवलात वळती करण्याचा कायदा या देशात आणण्याचा घाट घातला जात आहे, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते.  

सत्ता आल्यास गरजेनुसार कर्जमाफी
शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे, त्यामुळे सत्तेत आल्यास गरजेनुसार शेतकऱ्यांना २००९ प्रमाणे पुन्हा कर्जमाफी देण्याची तयारी आहे. हमीभावाचे धोरण जाहीर करू, हमीभावानुसार शेतमाल खरेदी केंद्रे सुरू करू आणि हमीभावानुसार शेतमाल विकला गेला नाही, तर कर्नाटकप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभावानुसारच्या तफावतीची नुकसान भरपाई देऊ, असे खासदार चव्हाण यांनी जाहीर केले.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...