agriculture news in Marathi, agrowon, ignorance from banks to target crop loan | Agrowon

पीककर्ज वाटप उद्दिष्टाला बॅंकांकडून कोलदांडा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018

सातारा : जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी रब्बी हंगामातील पीककर्ज वितरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. मागील पाच महिन्यांत बॅंकांनी उद्दिष्टाच्या अवघे ३५ टक्के कर्ज वितरण केले आहे. जिल्हा बॅंकेने सर्वाधिक उद्दिष्टाच्या ५३ टक्के वाटप केले आहे. कर्ज वाटपाची अंतिम मुदत ३१ मार्च असून, या कालावधीत राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंका ५० टक्के तरी उद्दिष्ट पूर्ण करणार का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

सातारा : जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी रब्बी हंगामातील पीककर्ज वितरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. मागील पाच महिन्यांत बॅंकांनी उद्दिष्टाच्या अवघे ३५ टक्के कर्ज वितरण केले आहे. जिल्हा बॅंकेने सर्वाधिक उद्दिष्टाच्या ५३ टक्के वाटप केले आहे. कर्ज वाटपाची अंतिम मुदत ३१ मार्च असून, या कालावधीत राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंका ५० टक्के तरी उद्दिष्ट पूर्ण करणार का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ११०० कोटी दहा लाख रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी फेब्रुवारीअखेर ३८१ कोटी ९८ लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले. रब्बीसाठी ऑक्‍टोबर महिन्यापासून कर्ज वितरण करण्यास प्रारंभ होतो. ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत बॅंकांकडून ३४ कोटी ८४ लाख रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्के पीक कर्जवाटप केले गेले. डिसेंबर महिन्यात बॅंकांकडून कर्जवाटपासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याने या महिन्यात केवळ एक टक्का कर्जवाटप केले गेले होते. 

यानंतर वाटप संथगतीने सुरू होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला ५४० कोटी उद्दिष्ट असून, यापैकी २८६ कोटी ९० लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. जिल्हा बॅंकेने एकूण उद्दिष्टापैकी ५३ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांसाठी ४४२ कोटी ८५ लाख उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यापैकी ४२ कोटी ४१ लाख म्हणजे केवळ १० टक्के वाटप केले आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये सर्वाधिक बॅंक ऑफ इंडियाने १० कोटी १० लाख रुपयांचे वितरण केले आहे. खासगी बॅंकांसाठी ११५ कोटी ५३ लाखांच्या उद्दिष्टापैकी केवळ ५२ कोटी ४३ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ४५ टक्के कर्जवाटप केले आहे.

बॅंकांवर कारवाई होणार का? 
रब्बी पीककर्ज वितरणासाठी कालावधी संपत आला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून कर्ज वितरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. सध्या वितरणाची गती पाहता सर्व बॅंकांचे ५० टक्केही वितरण पूर्ण होणार नसल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना भांडवलासाठी पैशाची गरज असतानाही बॅंका शेतकऱ्यांपर्यंत पोचत नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. भांडवलासाठी पैसे नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे ज्या बॅंका किमान उद्दिष्ट ५० टक्के पूर्ण करणार नाहीत; अशा बॅंकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...