agriculture news in Marathi, agrowon, Increase in the commodity commission of turdal sales | Agrowon

तूरडाळ विक्रीसाठी स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 मे 2018

मुंबई  : राज्य सरकारकडील तूरडाळीची राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी, यासाठी अशा दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये इतके कमिशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

मुंबई  : राज्य सरकारकडील तूरडाळीची राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी, यासाठी अशा दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये इतके कमिशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तूरडाळीची विक्री राज्यातील रास्त धान्य दुकानांतून करण्याचा निर्णय पणन विभागाने घेतला आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार रास्तभाव दुकानदारांना अन्नधान्य वितरणासाठी पॉस मशिनद्वारे होणाऱ्या व्यवहारानुसार वितरित होणाऱ्या तूरडाळीस दीड रुपये प्रतिकिलो व पॉस मशिनव्यतिरिक्त होणाऱ्या तूरडाळीस ७० पैसे प्रतिकिलो एवढे कमिशन देण्यात येत होते. तूरडाळीचा विक्री दर ५५ रुपये प्रतिकिलो आहे. सरकारकडील तूरडाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे.

राज्यात रास्तभाव दुकानातून आतापर्यंत एकूण १ लाख ६६ हजार ७५ क्विंटल तूरडाळीचे वाटप करण्यात आले असून, त्यापैकी १ लाख ५१ हजार २८९ क्विंटल तूरडाळ वितरित झाली आहे. यात मे महिन्यासाठी रायगड ४४४ क्विंटल, नंदुरबार २३८ क्विंटल, सातारा २२५० क्विंटल, सांगली ३८३६ क्विंटल, कोल्हापूर २९०० क्विंटल, जालना ४३९ क्विंटल, बीड ५०० क्विंटल, उस्मानाबाद १५० क्विंटल, अकोला ५०० क्विंटल, वाशीम ४०० क्विंटल, अमरावती १७५० क्विंटल, यवतमाळ २६७८ क्विंटल, नागपूर २००० क्विंटल, वर्धा ४०० क्विंटल, भंडारा २४५० क्विंटल, गोंदिया ४००० क्विंटल, गडचिरोली ५९५ क्विंटल, पालघर ९०३ क्विंटल असे एकूण २६ हजार ४३५ क्विंटल वाटप मे महिन्यासाठी झाले आहे. 

डिसेंबर २०१७ पासून राज्यातील रास्तभाव दुकानदारांना तूरडाळ विक्रीसाठी देण्यात आली आहे. डिसेंबर २०१७ ला राज्यात ८४ हजार ४९९ क्विंटल, जानेवारी २०१८ मध्ये ३७ हजार ५३३ क्विंटल, फेब्रुवारीमध्ये ८ हजार ८१२ क्विंटल, मार्च ९८० क्विंटल, एप्रिल ६ हजार ४३६, आणि मे महिन्यासाठी २६ हजार ४३५ तूरडाळ वाटप करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...