agriculture news in Marathi, agrowon, Ingle is State Control Director | Agrowon

राज्याच्या गुण नियंत्रण संचालकपदी इंगळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

पुणे  : राज्याच्या कृषी खात्यातील प्रत्येकाचे लक्ष लागून असलेल्या गुण नियंत्रण संचालकपदी अखेर विजयकुमार इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तांच्या खालोखाल सर्वांत महत्त्वाचे पद म्हणून गुण नियंत्रण संचालकांच्या खुर्चीकडे पाहिले जाते. 

पुणे  : राज्याच्या कृषी खात्यातील प्रत्येकाचे लक्ष लागून असलेल्या गुण नियंत्रण संचालकपदी अखेर विजयकुमार इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तांच्या खालोखाल सर्वांत महत्त्वाचे पद म्हणून गुण नियंत्रण संचालकांच्या खुर्चीकडे पाहिले जाते. 

कृषी खात्याच्या निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे प्रमुख म्हणून गुण नियंत्रण संचालक कामकाज बघतात. खते, बियाणे आणि कीडनाशकांचे उत्पादन, वितरण व विक्री करणाऱ्या कंपन्यांवर नजर ठेवणे तसेच फौजदारी कारवाईचे अधिकारदेखील संचालकांना असल्यामुळे इनपुट उद्योगाचेही लक्ष या नियुक्तीकडे लागून होते. 
संचालकपदावर गेल्या वर्षी अशोक लोखंडे यांची नियुक्ती झाली, पण सप्टेंबरला ते निवृत्त झाले होते. त्यामुळे संचालकपदाची तात्पुरती जबाबदारी आता पुणे विभागाचे कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांच्याकडे देण्यात आली होती. सदर पदावर कामाची संधी मिळण्यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू होते. 

मधल्या काळात मात्र राज्य शासनाने संचालकपदाच्या नियुक्त्या लांबविल्या. गुण नियंत्रण संचालकपदी कोणाचीही कायम नियुक्ती न करता सहसंचालक मच्छिंद्र घोलप यांच्याकडे गेल्या ९ महिन्यांपासून तात्पुरती सूत्रे देण्यात आली होती. त्यामुळे या पदावर श्री. इंगळे येतात की श्री. घोलप याविषयी राज्यभर चर्चा होती.  नवे संचालक श्री. इंगळे सोलापूरच्या माढा भागातील असून, अलाहाबाद बॅंकेत ते क्षेत्रीय अधिकारी होते. शेतीशी सुरवातीपासून जवळचा संबंध असलेल्या श्री. इंगळे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विभागीय मृदसंधारण अधिकारी म्हणून उस्मानाबादला पाच वर्षे सुरवातीला काम केले. त्यानंतर लातूरला मृदसंधारण उपसंचालक, साखर सहसंचालक आणि रामेतीचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. नांदेडमध्ये तीन वर्षे एसएओ म्हणून तसेच ठाणे व पुणे विभागांचे सहसंचालक म्हणून मी जबाबदारी सांभाळली आहे.

शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मला बारकाईने माहिती असून, राज्यात खते, बियाणे वितरणातील समस्या कमी करण्यास आपले प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया श्री. इंगळे यांनी व्यक्त केली. राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर, तसेच इतर सर्व गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी श्री. इंगळे यांचे स्वागत केले आहे. श्री. इंगळे व श्री. काटकर यांनी संयुक्तपणे अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, ते गुण नियंत्रण विभागाला चांगली दिशा देतील, अशी प्रतिक्रिया कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे. 

घोलप ठरले औटघटकेचे संचालक
संचालकपदाच्या बढतीसाठी गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहणारे सहसंचालक मच्छिंद्र घोलप यांना निवृत्तीला केवळ चार दिवस राहिलेले असताना संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विस्तार, आत्मा, कृषी प्रक्रिया अशी तीन संचालकपदे रिक्त असताना अकोल्याच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक म्हणून त्यांची 'ऑर्डर' काढण्यात आली.
 

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...