खुल्या कुक्कुटपालनाला उन्हाच्या तीव्रतेचा फटका

ok
ok

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्याचा फटका खुल्या गावरान कोंबडीपालनाला बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेने कोंबड्या दगावू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये तीनशेवर कोंबड्या दगावल्या आहेत. मानमोडी (राणीखेत डिसीज) रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता असलेल्या तालुक्‍यात हे प्रमाण अधिक आहे. 

नगर जिल्ह्यात कुक्कुटपालनासाठी शेतकऱ्यांनी आपापले शेड उभारले आहेत. त्याचे व्यवस्थापन करताना त्यातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणाही बसवलेली असते. असे असले तरी खुले गावरान कोंबडीपालनही मोठ्या प्रमाणात केले जाते. गावरान कोंबडीला मागणीही अधिक असते. बहुतांश कुटुंबे आपल्या कौटुंबिक खर्चाला हातभार लागावा यासाठी आपल्या परस दारात, शेतात, घराच्या अंगणात मोठ्या प्रमाणात गावरान कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यातून मिळणाऱ्या अंडी, मांस यापासून कुटुंबाचा घरखर्च भागवता येतो. 

यंदा खुल्या गावरान कोंबडी पालनाला मात्र तीव्र उष्णतेचा फटका बसत आहे. या वर्षी जिल्हाभरात तापमान ४२ अंशांच्या पुढे जात आहे. खुल्या कोंबडी पालनात तापमान नियंत्रणाची सुविधा नसते. त्यामुळे उन्हाचा फटका गावरान कोंबड्यांना बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाभरात आतापर्यंत केवळ उन्हाची तीव्रता सहन न झाल्याने जवळपास तीनशेवर कोंबड्या मरण पावल्या आहेत. काही भागात मानमोडीसारख्या रोगाचाही फैलाव होत आहे. त्याच्या परिणामामुळे कोंबड्या व त्यांची पिले दगावत आहेत. त्यामुळे यंदा उन्हाचा गंभीर परिणाम खुल्या कुक्कुटपालनावर होताना दिसत आहे. 

उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना मानमोडी रोगाचा प्रादुर्भाव होतो. मानमोडी हा कोंबड्यांना होणारा रोग हवेच्या माध्यमातून जलद गतीने फैलावतो. या वर्षी तापमानात वाढ झाल्याने गावरान कोंबड्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्याजवळील पशू आरोग्य केंद्रातून या कोंबड्यांना आर. डी. व लासोटा या लसी टोचून घ्याव्यात. कोंबड्यांची राहण्याची जागा, खुराडी रोज स्वच्छ करावीत. - डॉ. वसंत गारुडकर,  पशुवैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी, नगर  

लासोटा बूस्टर लसीकरण करणे गरजे आहे. वातावरण बदल, पक्ष्यांना इलेक्‍ट्रोलाइट पावडर व व्हिटॅमीन सी पाण्यातून दिले पाहिजे. चार वेळा थंड पाणी पाजणे आणि ते पिण्याचे पाणी सतत बदलणे गरजेचे आहे. शिवाय कोंबड्या थांबवण्यासाठी थंडावा देणारी सावलीही असणे महत्त्वाचे आहे. - संतोष कानडे,  गावरान कोंबडीचे अभ्यासक, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com