पावसामुळे कोल्हापूरातील गूळ हंगाम लांबणीवर
राजकुमार चौगुले
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

दररोज पाऊस पडत असल्याने जळण ओले होण्याची शक्‍यता असल्याने बहुतांशी गुऱ्हाळमालकांनी गुऱ्हाळ सुरू करण्याचे धाडस केले नाही. 

कोल्हापूर : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पडणाऱ्या जोरदार पावसामुळे गूळ हंगामा लांबण्याची शक्‍यता आहे. दररोजच्या पावसाने गुऱ्हाळ सुरू करण्यबाबत कोणतीच हालचाल करता येत नसल्याने गुऱ्हाळघरमालक पावसाच्या उघडिपीच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज पाऊस पडत असल्याने जळण ओले होण्याची शक्‍यता असल्याने बहुतांशी गुऱ्हाळमालकांनी गुऱ्हाळ सुरू करण्याचे धाडस केले नाही. 

जिल्ह्याचा गूळ हंगाम तोंडावर आला आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील अनेक गूळ उत्पादक शेतकरी गुऱ्हाळ सुरू करतात. मुहूर्ताच्या सौद्याला दरही चांगले मिळत असल्याने गूळ लवकरात लवकर तयार करून बाजारपेठेत पाठविण्याचा प्रयत्न असतो.

गणेशोत्वसव झाला की गुऱ्हाळघरांची तयारीही वेगात सुरू होते. पंधरवड्यापूर्वी काही दिवस वातावरण चांगले होते. पाऊस नसल्याने गूळ उत्पाकांनी गुऱ्हाळ सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली होती. परंतु दररोज दुपारनंतर पडणाऱ्या पावसाने या तयारीला ब्रेक लावला आहे. दिवसभर कडक ऊन जरी असले, तरी एक दोन तास मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वच शेतकामे करणे अडचणीचे झाले आहे. याचा फटका गूळ उद्योगालाही बसत असलचे गूळ उद्योगातील सूत्रांनी सांगितले. 

गुऱ्हाळ सुरू करण्यासाठी शक्‍यतो कोरडे हवामान लागते. उसाची वाहतूक, जळणाची सुरक्षितता व तयार झालेल्या गुळासाठी हे हवामान चांगले असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून संततधार नसला, तरी दररोज काही काळ तरी जोरदार पाऊस होत असल्याने यामुळे गुऱ्हाळघराची यंत्रणाच ठप्प झाली आहे. जोपर्यंत सलगपणे कडक ऊन पडणार नाही तोपर्यंत गुऱ्हाळघरे सुरू करणे अशक्‍य असल्याचे गुऱ्हाळघरचालकांनी सांगितले.

कामगारांची जुळवाजुळव झाली असली, तरी पाऊस थांबल्याशिवाय काहीच करू शकत नसल्याने कामगारांनाही अद्याप बोलावले नसल्याचे गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. यातच वाफसाही नसल्याने उसाची वाहतूक करणेही अडचणीचे झाले असल्याने काही दिवस तरी गूळनिर्मिती करणे अशक्‍य असल्याचा अंदाज गूळ उद्योगातून व्यक्त होत आहे. 

बाजार समितीतही आवक नाही 
येथील बाजार समितीत या परिसरातून गुळाची आवकही जवळ जवळ थांबल्याचे बाजार समितीचे सचिव दिलीप राऊत यांनी सांगितले. कर्नाटकातून सप्ताहातून एक ते दोन दिवस गुळाची आवक होत आहे. त्याचाच सौदा काढण्यात येत आहे. अजून कोल्हापूर जिल्ह्याच्या गूळ पट्ट्यातून गुळाची आवक होत नाही. पावसामुळे आवक लांबत असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...