agriculture news in Marathi, agrowon, in Jalgaon only one government shopping center | Agrowon

जळगावमध्ये एकच शासकीय खरेदी केंद्र
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

जळगाव : जिल्ह्यात नाफेडचे एकच हरभरा खरेदी केंद्र मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुरू आहे. इतर ११ केंद्रे सुरू करण्याचा मुहूर्त अजूनही निश्‍चित झालेला नाही. यातच खासगी बाजार किंवा बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर स्थिर आहेत. 

जळगाव : जिल्ह्यात नाफेडचे एकच हरभरा खरेदी केंद्र मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुरू आहे. इतर ११ केंद्रे सुरू करण्याचा मुहूर्त अजूनही निश्‍चित झालेला नाही. यातच खासगी बाजार किंवा बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर स्थिर आहेत. 

काबुली हरभऱ्याला ५५०० रुपये प्रतिक्विंटल तर इतर हरभऱ्याला प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. बाजार समित्यांमध्ये आवकेत वाढ होत आहे. मार्च महिन्यात जळगाव बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५०० क्विंटल आवक झाली. काबुली हरभऱ्याची फारशी आवक नव्हती, तर चोपडा व अमळनेर बाजार समितीमध्ये प्रतिदिन ८०० क्विंटलपर्यंत आवक झाली. सर्वच बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर स्थिर आहेत. 

इंदूरलाही दर स्थिर
इंदूर येथील बाजार समितीमध्येही काबुली हरभरा व इतर हरभऱ्याचे दर स्थिर आहेत. तेथे काबुली हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५६५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. बऱ्हाणपूर बाजारातही दर स्थिर असल्याची माहिती मिळाली. 

शासकीय केंद्रांची संख्या केव्हा वाढेल?
शासकीय हरभरा खरेदी केंद्रांची संख्याही जिल्ह्यात वाढलेली नाही. सध्या फक्त भडगाव येथे खरेदी केंद्र सुरू आहे. जिल्ह्यात १२ हरभरा खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यात चाळीसगाव, यावल, रावेर, जळगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा, मुक्ताईनगर, बोदवड, पारोळा, जामनेर यांचा समावेश आहे. यातील पारोळा व इतर दोन केंद्रे या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन मार्केटिंग फेडरेशनने केले होते; परंतु भडगाव वगळता कोणतेही केंद्र सुरू झाले नाही. तुरीची आवक कमी झाल्यानंतर हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...