agriculture news in Marathi, agrowon, JCB allotment to encourage innovators | Agrowon

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीबीचे वाटप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018

सोलापूर  : "जलयुक्त शिवारच्या कामांना व्यवसायाची जोड देऊन सक्षम उद्योजक बनविण्यासाठी शासनाने जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजना आणली. राज्यभरातील नवउद्योजकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठीच या योजनेतून जेसीबी वाटपाचा निर्णय सरकारने घेतला,'''' अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली. 

सोलापूर  : "जलयुक्त शिवारच्या कामांना व्यवसायाची जोड देऊन सक्षम उद्योजक बनविण्यासाठी शासनाने जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजना आणली. राज्यभरातील नवउद्योजकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठीच या योजनेतून जेसीबी वाटपाचा निर्णय सरकारने घेतला,'''' अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली. 

राज्य शासनाच्या सहकार विकास महामंडळामार्फत जलयुक्त शिवार अभियान, जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी यंत्रसामुग्री (अर्थ मूव्हर्स) व्याज अर्थसाह्य योजनेअंतर्गत राज्यभरात जिल्हानिहाय १ हजार जेसीबी यंत्र देण्याचे नियोजन केले असून, सुशिक्षित बेरोजगार तरुण, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, विविध कार्यकारी संस्था यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

नुकताच अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत या योजनेचा लकी ड्रॉ काढण्यात आला. राज्यात पहिल्यांदाच या योजनेची सुरवात सोलापुरातून होत आहे. या योजनेच्या माध्यमातून २५ जेसीबीचे वाटप जिल्ह्यातील नवउद्योजक तरुणांना करण्यात आले. त्या वेळी मंत्री देशमुख बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी उन्मेष बिराजदार, उपकार्यकारी अभियंता पी. एस. पाटील, भाजपचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सचिन कल्याणशेट्टी, नगरसेवक संतोष भोसले, नगरसेविका अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते.

या योजनेबाबत मंत्री देशमुख म्हणाले, "तरुणांनी या यंत्राचा योग्य पद्धतीने व्यावसायिक वापर करून आपले उत्पन्न वाढवावे. अधिकाधिक तरुणांनी याचा लाभ घ्यावा, त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना वित्तीय संस्थेकडून यंत्रसामुग्रीसाठी सुमारे १७ लाख ६० हजार रुपये १२ टक्के व्याजदराने देण्यात येते. अर्थात, त्यात लाभार्थी हिस्सा म्हणून २० टक्के रक्कम भरणे आवश्‍यक आहे. या योजनेमध्ये राज्य शासनाकडून कमाल व्याज परतावा रक्कम ही पाच वर्षांसाठी ५ लाख ९० हजार इतकी देण्यात येणार आहे. तसेच, पात्र लाभार्थ्यांना अर्थ मुव्हिंग मशीन संदर्भात राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.''''

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...