agriculture news in Marathi, agrowon, JNPT preparations for take over Nifad factories land | Agrowon

ड्रायपोर्टसाठी निफाड कारखान्याची जागा घेण्याची जेएनपीटीची तयारी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नाशिक  : निफाड साखर कारखान्याची जागा १०५ कोटींना खरेदी करण्याची तयारी ‘जेएनपीटी’ने दर्शविली आहे. ही जागा कर्जामुळे नाशिक जिल्हा बॅंकेकडे तारण असून, बॅंकेच्या संचालक मंडळाने या व्यवहाराला संमती दिल्यास निफाड तालुक्‍यात डायपोर्ट उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.

नाशिक  : निफाड साखर कारखान्याची जागा १०५ कोटींना खरेदी करण्याची तयारी ‘जेएनपीटी’ने दर्शविली आहे. ही जागा कर्जामुळे नाशिक जिल्हा बॅंकेकडे तारण असून, बॅंकेच्या संचालक मंडळाने या व्यवहाराला संमती दिल्यास निफाड तालुक्‍यात डायपोर्ट उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.

शेतीमालाच्या जपणुकीसाठी निफाड तालुक्‍यात ड्रायपोर्ट उभारण्याचा राज्य सरकारचा मनोदय आहे. त्यासाठी निफाड तालुक्‍यात सरकारला जागेची आवश्‍यकता आहे. कर्जबाजारीपणामुळे बंद असलेल्या निफाड साखर कारखान्याकडे १०० ते १५० एकर जागा आहे. ही जागा घेण्यासाठी हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत; परंतु या कारखान्याकडून १०८ कोटी रुपयांची कर्जवसुली होणे बाकी असून, ही जागा जिल्हा बॅंकेकडे तारण आहे. कर्जवसुलीसाठी बॅंकेने तीन वेळा या जागेच्या लिलावाची प्रक्रिया राबविली. मात्र, एवढी रक्कम देऊन कारखान्याची जागा खरेदी करण्यास कुणी पुढे आलेले नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेला यश येऊ शकले नाही.

जेएनपीटीलाही ड्रायपोर्टसाठी जागा हवी असल्याने त्यांनी १०५ कोटी रुपयांत ही जागा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे; परंतु बॅंकेला १०८ कोटी रुपये येणे अपेक्षित असल्याने पेच निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक बोलावण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निफाडचे प्रांताधिकारी महेश पाटील, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, जेएनपीटीने १०५ कोटी रुपयांत कारखान्याची जागा खरेदीची तयारी दर्शविली आहे. या किमतीत जागा देण्यास कारखाना राजी असेल तर तसे पत्र जिल्हा बॅंकेला द्यावे, अशी सूचना या बैठकीत जिल्हा प्रशासनाने केली. या पत्रामधील प्रस्ताव मान्य अथवा अमान्य करण्याबाबत जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ निर्णय घेईल.

१०८ ऐवजी १०५ कोटी रुपये स्वीकारण्यास जिल्हा बॅंक राजी असेल तर त्यांनी तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जेएनपीटीकडे पाठविला जाईल. त्यानंतर बॅंकेला पैसे अदा करून कारखान्याची जागा ड्रायपोर्टसाठी ताब्यात घेण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसे झाल्यास कारखाना कर्जमुक्त होणार असून ड्रायपोर्ट उभारणीचा मार्गही मोकळा होणार                                             आहे.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...