agriculture news in Marathi, agrowon, Junk activities under e-name system of market committee | Agrowon

बाजार समितीमधील ई-नाम प्रणालीअंतर्गत व्यवहार ठप्प
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 एप्रिल 2018

औरंगाबाद : रडत खडत सुरू झालेल्या औरंगाबाद बाजार समितीमधील ई-नाम प्रणालीने शेतमाल खरेदीला लागलेले ग्रहण संपण्याचे नाव घेत नाहीय. ई-नाम प्रणाली सर्वत्र एकत्रित लागू करा या मागणीसाठी बाजार समितीमधील मर्चंट असोसिएशनने ई-नाम प्रणाली विरोधात मंगळवारी (ता. ३) बंद पुकारला. त्यामुळे बाजार समितीमधील ई-नाम प्रणालींतर्गत संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. 

औरंगाबाद : रडत खडत सुरू झालेल्या औरंगाबाद बाजार समितीमधील ई-नाम प्रणालीने शेतमाल खरेदीला लागलेले ग्रहण संपण्याचे नाव घेत नाहीय. ई-नाम प्रणाली सर्वत्र एकत्रित लागू करा या मागणीसाठी बाजार समितीमधील मर्चंट असोसिएशनने ई-नाम प्रणाली विरोधात मंगळवारी (ता. ३) बंद पुकारला. त्यामुळे बाजार समितीमधील ई-नाम प्रणालींतर्गत संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. 

ई-नाम प्रणाली सर्वत्र एकत्रित लागू करा, अशी मागणी करीत अडत व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता. २) बाजार समिती समोर धरणे आंदोलन केले. या वेळी ई-नाम प्रणालीविरोधात मंगळवारपासून (ता. ३) बंदची हाक देण्यात आली होती. केंद्र सरकारने ई-नाम प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यातील औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२ मार्चपासून ई-नाम प्रणाली लागू करण्यात आली. तेव्हापासून ई-नाम प्रणालीच्या माध्यमातूनच शेतमालाचा व्यवहार करण्यात आला. 

पहिल्या आठवड्यातील मर्चंट असोसिएशनचा विरोध मावळल्यानंतर सारं काही सुरळीत होऊन ई-नाम प्रणालीचा स्वीकार केला जाईल असे वाटत असतानाच आता या प्रणाली विरोधात पुन्हा मर्चंट असोसिएशनने विरोधाची भूमिका घेतली आहे. ई-नाम प्रणाली बंद करण्याची घोषणा देत बाजार समिती सभापती यांना निवेदन देण्यात आले. बाजार समितीत येणारा माल इतरत्र जात असल्याने बाजार समितीचे नुकसान होत आहे. ही ई-नाम प्रणाली सर्वत्र लागू होईपर्यंत येथेही लागू करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
 

शासनाने बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणाली लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी प्रक्रियेत असहकार नोंदवून बाजार समितीला कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू नये. 
- राधाकिसन पठाडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद.

इतर बातम्या
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...