agriculture news in marathi, Agrowon, Justice for farmers its my role | Agrowon

शेतकऱ्यांना न्याय मिळायवा हीच भूमिका : पटोले
गोपाल हागे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

अकोला : भारत हा कृषिप्रधान देश म्हटला जातो, मात्र सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कायम चेष्टाच केली गेली. जर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असेल तर त्यात चुकीचे काय. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आपली भूमिका असून यापुढेही राहील, असे स्पष्ट मत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मांडले.

अकोला : भारत हा कृषिप्रधान देश म्हटला जातो, मात्र सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कायम चेष्टाच केली गेली. जर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असेल तर त्यात चुकीचे काय. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आपली भूमिका असून यापुढेही राहील, असे स्पष्ट मत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मांडले.

शेतकरी जागर मंचतर्फे रविवारी (ता. २४) येथील खंडेलवाल भवनात शेतकरी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, प्रशांत गावंडे, कृष्णा अंधारे, महादेवराव भुईभार, डॉ. हर्षवर्धन मालोकार, अविनाश नाकट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. पटोले पुढे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांची या हंगामात हजारो क्विंटल तूर विकली नाही. ज्यांनी विकली त्यांना पैसे मिळालेले नाहीत. सरकारने कर्जमाफी देताना त्यात अनेक जाचक अटी ठेवल्या. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या वाढल्या. जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून ही जर समस्या शासनदरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करीत असेल तर त्याच चूक काय, असा सवाल श्री. पटोले यांनी उपस्थित केला.

तसेच देशातील शेतकरी व शेतीचा विकास करायचा असेल तर शासनाने शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडायला हवा, शेतमालाचे सर्मथनमूल्य वाढले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मतभेद बाजूला सारून एकत्र आले पाहिजे. लढा द्यायला हवा. शेतकरी आत्महत्या करीत असताना कृषिमंत्र्यांनी सक्रिय असायला हवे. परंतु राज्याप्रमाणेच केंद्रातील कृषिमंत्री केवळ नावालाच असल्याचा आरोप श्री. पटोले यांनी केला. या कार्यक्रमाचे संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...