agriculture news in Marathi, agrowon, Kaniphanath Maharaj yatra started | Agrowon

कानिफनाथ महाराज यात्रेला सुरवात
सूर्यकांत नेटके
बुधवार, 7 मार्च 2018

नगर ः नाथ पंथाचे श्रद्धास्थान आणि भटक्‍या समाजाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेला आजपासून (मंगळवारी) सुरवात झाली. यात्रेनिमित्त येथे भरत असलेला गाढवांचा बाजार राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. यंदाही येथे भरलेल्या गाढवांच्या बाजारात तीन हजारहून अधिक गाढवे विक्रीला आली आहेत. पंधरा दिवस चालणारी ही यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे.

नगर ः नाथ पंथाचे श्रद्धास्थान आणि भटक्‍या समाजाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेला आजपासून (मंगळवारी) सुरवात झाली. यात्रेनिमित्त येथे भरत असलेला गाढवांचा बाजार राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. यंदाही येथे भरलेल्या गाढवांच्या बाजारात तीन हजारहून अधिक गाढवे विक्रीला आली आहेत. पंधरा दिवस चालणारी ही यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे.

नगर-पाथर्डी रस्त्यावरून दक्षिणेला गर्भगिरी डोंगरांच्या कुशीत मढी (ता. पाथर्डी) येथे कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. त्यांनी रंगपंचमीला समाधी घेतल्याने यात्रेत या दिवसाला महत्त्व आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून अठरापगड जातींचे भक्त येथे नाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी रंगपंचमीपासून येत असतात. नाथांच्या कार्यकाळात व कानिफनाथ गडाच्या उभारणीत गोपाळ समाजाचे योगदान मोठे होते, म्हणून येथील होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजाला आहे. 

यंदा गुरुवारी (ता. १) हरिदास काळापहाड, हरिभाऊ हंबीरराव, नामदेव माळी, पुंडलिक नवघरे, माणिक लोणारे, सुंदर गिऱ्हे यांच्या हस्ते होळी पेटवून व कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला टेकवून यात्रेला सुरवात झाली. मात्र खऱ्या अर्थाने यात्रा रंगपंचमीपासूनच सुरू होते. आजपासून येथे राज्य व राज्याबाहेरील भाविकांनी नाथांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. 

गुढीपाडव्याच्या दिवशी महापूजा, गंजाजलाने कानिफनाथांच्या समाधीला अभिषेक करून यात्रेचा समारोप होणार आहे. मढी यात्रेत रेवड्याच्या प्रसादाचा मान आहे. त्यामुळे येथे रेवड्याचीही मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. यंदाही रेवडीला मोठी मागणी आहे. गाढवाच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी आडीच ते तीन हजार गाढवे येतात. यंदाही राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून गाढवे विक्रीसाठी आली आहेत. यंदा गावरान गाढवाला साधारण आठ ते बारा हजार तर काठेवाडी गाढवाला पंधरा ते बावीस हजार दर आहे. 

जातपंचायत झाली बंद
मढीच्या यात्रेत भटक्‍या समाजाच्या विविध जातपंचायती बसायच्या. वर्षानुवर्षे जातपंचायती भरण्याची परंपरा कायम होती. जातपंचायतीतून समाजिक, वैयक्तिकसह सर्व वादावर तोडगा काढला जायचा व पंचायतीने दिलेला निर्णय त्या-त्या समाजाला मान्य करावा लागत असे. गेल्या वर्षीपासून जायपंचायती बंद झाल्या आहेत. आता त्याएेवजी समाजाचे मेळावे घेतले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. ५) मढीत भटक्‍या समाजाचा मेळावा झाला. त्यामुळे जातपंचायत बंद झाल्याची मोठी क्रांती समजली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...