agriculture news in marathi, agrowon, kem project, yavatmal, buldana | Agrowon

यवतमाळ-बुलडाणा प्रकल्प व्यवस्थापकांवर फौजदारीचे आदेश
विनोद इंगोले
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या यवतमाळ आणि बुलडाणा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाच्या कारवाईची सूचना विभागीय आयुक्‍तांना केली आहे. के. एम. अहमद यांच्या पूर्वी असलेल्या प्रकल्प संचालकाच्या कामाबद्दलही चौकशीची गरज आहे. शासनाला तशी शिफारस केली जाणार आहे.
- किशोर तिवारी, अध्यक्ष, (कै.) वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन

अमरावती : जिल्ह्यात राबविलेल्या प्रकल्पांची माहिती नसल्याच्या कारणांमुळे समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या अकोला जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकाला बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर आता यवतमाळ आणि बुलडाणा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाईचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. 

यवतमाळ आणि बुलडाणा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकांवर आर्थिक अनियमिततेचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. यवतमाळ येथील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकाला यासंबंधी दिलेल्या पत्रात व्हाऊचर क्रमांक ६६९, ७०५, ७०८, ७०९, ६७७, ६७९, ६८४, ८०८, ८१८, ६८९ या संदर्भाने खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद, पुणे तसेच यवतमाळ परिसरातील संस्थांना लाभ पोचविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

काही प्रकरणांत करार न करताच खरेदीचे प्रकार घडल्याचेही समोर आले आहे. बुलडाणा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकावरदेखील आर्थिक अनियमिततेचे आरोप आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी सूचना किशोर तिवारी यांनी केली.

विभागीय आयुक्‍तांनीदेखील यवतमाळ व बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यावर या प्रकरणी फौजदारी कारवाई होण्याचे संकेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

प्रकल्पात कौशल्य विकासाची कामे समाविष्ट नसताना त्यावर गत एक ते दीड वर्षात कोट्यवधीचा खर्च झाला. संस्थांच्या माध्यमातून शेतीपूरक कामे करावयाची होती. प्रत्यक्षात ५० ते ६० लाख रुपयांची पुस्तके खरेदी करण्यात आली. ब्युटी पार्लर प्रशिक्षणावर २० ते २२ लाख रुपयांचा खर्च झाला.

प्रकल्पाच्या सुरवातीला कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वापरासाठी महागडे मोबाईल आणि लॅपटॉप खरेदी करण्यात आले. या संदर्भात जबाबदार असलेल्यांची  यादी तयार करावी. त्यांच्यासह केवळ कागदोपत्री लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडूनदेखील रक्‍कम वसूल करावी, असे आदेश प्रभारी प्रकल्प संचालक के. एम. अहमद यांनी दिल्याचे तिवारी यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून...
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...