वनामकृविचे ९५३ हेक्टरवर खरीप पीक बीजोत्पादन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रावर यंदाच्या खरीप हंगामामध्ये विद्यापीठाच्या विविध पिकांच्या वाणांचा ९५३ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. एकूण ८ हजार ८९६ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर घेण्यात येतो.

पैदासकार, पायाभूत, प्रमाणित, विश्वनीय असे विविध प्रकारचे बियाणे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या खरीप हंगामात विद्यापीठाने संशोधित केलेल्या ज्वारीच्या पीव्हीके ४००, पीव्हीके ८०१, पीव्हीके ८०२ या वाणांचे बाजरीच्या एबीपीसी ४-३, एएचबी १२००, एएचबी १२६९ या वाणांचे, भाताच्या तेरणा, टीजेपी ४८, पराग या वाणांचे, कपाशीच्या पीए ०८, पीए २५५, पीए ५२८, एनएच ६१५, बीएन १५, एसी ७३८ या वाणांचे, तागाच्या जेआरओ ५२४ वाणाचे, मुगाच्या बीएम ४, बीएम २००१-१, बीएम २००३-२, उडदाच्या टीएयू १, एकेयू १५, एकेयू १-१०, तुरीच्या बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३, बीडीएन ७०८, बीडीएन ७११, बीडीएन ७१६ या वाणांचे, सोयाबीनच्या एमएयूएस ७१, एमएयूएस ८१, एमएयूएस १५८, एमएयूस १६२, एमएयूएस ६१२, जेएस ३३५, जेएस ९३-०५, जेएस २०-३४, जेएस २०-२९ या वांणाचे, भुईमुगाच्या टीएलजी ४५, एलजीएन १ या वाणांचे, सूर्यफुलाच्या एलएसएफएच १७१ या वाणाचे, भेंडीच्या पीबीएन क्रांती, पीबीएन ओके या वाणांचे मिळून एकूण ९५३.९१ हेक्टरवर बिजोत्पादन घेण्यात येणार असून ८ हजार ८९६ .९ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले. २९ लाख ८५ हजार रुपयांचे बियाणे विक्री वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी १८ मे रोजी खरीप हंगामातील बियाणे विक्रीस प्रारंभ होतो. यंदा १८ मे रोजी सोयाबीनचे २६० क्विंटल, तुरीचे १२८ क्विंटल, मुगाचे १५ क्विंटल अशी एकूण ४०३ क्विंटल बियाणाची विक्री झाली. त्यानंतर शुक्रवारपर्यंत  (ता.२५) तुरीचे ३० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. सोयाबीनच्या ७०० क्विंटल बियाणांचा महाबीजला पुरवठा करण्यात आला.

तुरीचे ५०० क्विंटल आणि मुगाचे २५ क्विंटल बियाणे शिल्लक होते. तुरीच्या बीडीएन ७११ वाणांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद येथील केव्हीकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. १८ मे रोजी २६ लाख ६३ हजार रुपये आणि त्यानंतरची मिळून एकूण २९ लाख ८५ हजार रुपयांची बियाणे विक्री झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com