agriculture news in marathi, agrowon, krushisevak | Agrowon

कृषिसेवक भरतीप्रकरणी आठवडाभरात अहवाल
मारुती कंदले
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

विधी व न्याय विभागाच्या निर्देशानुसार पुढील भूमिका घेतली जाणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसात विधी व न्याय विभागाचा हा अहवाल कृषी खात्याला मिळणे अपेक्षित आहे. तोपर्यंत थांबा आणि पाहा अशी भूमिका कृषी खात्याने घेतली आहे.

मुंबई : वादग्रस्त ठरलेल्या कृषिसेवक भरती प्रक्रियेसंदर्भात पुढे काय करायचे याबाबत कृषी खात्याने राज्याच्या विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय मागविला आहे.

या विभागाचे मत आल्यानंतर मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे की संबंधित उमेदवारांना रुजू करुन घ्यायचे याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थांनी सांगितले.

कृषिसेवक परीक्षा वादग्रस्त ठरल्यामुळे ७३० उमेदवारांची निवड यादी राज्य सरकारने रद्द केली होती. तसेच भारांकन पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. या परीक्षेत गैरप्रकार झाल्यामुळे सरकारने ही भूमिका घेतली होती.

मात्र, कृषिसेवकांची भरती भारांकन पद्धतीने करण्याचा राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) अखेर रद्द केला आहे.

परीक्षेनंतर जाहीर झालेल्या ७३० उमेदवारांना रुजू करून घ्यावे, असे आदेशदेखील न्यायाधिकरणाने राज्य सरकारला दिले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मॅटने हा निकाल दिला. आता या गोष्टीला एक महिना होत आहे. त्यामुळे या विषयावरून निवड झालेल्या उमेदवारांमध्ये विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

कृषी खात्यासमोर पेच
दरम्यानच्या काळात कृषी विभागाने राज्याच्या विधी व न्याय विभागापुढे हा विषय नेला आहे. यासंदर्भाने कृषी खात्यात सध्या वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

त्यामुळे मॅटने दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे अथवा परीक्षेनंतर निवडल्या गेलेल्या ७३० उमेदवारांना रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू करायची अशा पेचात कृषी खाते अ़डकले आहे. त्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या अभिप्रायाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भावपरभणी : सलग तीन आठवडे  पावसाचा खंड आणि...
पर्यावरणपूरक अक्षय ऊर्जा फायदेशीर देशात उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी...
अस्मानी कहरराज्यात जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा पहिला...
देशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...