agriculture news in Marathi, agrowon, Lack of coordination among officials in Kolhapur | Agrowon

कोल्हापुर जिल्ह्यात कृषी विभागात ‘बुरे दिन’
राजकुमार चौगुले
शनिवार, 7 एप्रिल 2018

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील कृषी विभागात ‘बुरे दिन’ आल्याचे चित्र आहे. विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असणारा समन्वयाचा अभाव, कृषी विभागात आलेली शिथिलता, वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तुटत असलेला संवाद याचा एकत्रित परिणाम कृषी विभागाच्या कामकाजावर झाला आहे. त्यातच कृषी महोत्सवाकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ आणि परत केलेला साडेतीन कोटी रुपयांचा निधी यामुळे सध्या कृषी विभागातील वातावरण बिघडल्याचे चित्र आहे. 

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील कृषी विभागात ‘बुरे दिन’ आल्याचे चित्र आहे. विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असणारा समन्वयाचा अभाव, कृषी विभागात आलेली शिथिलता, वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तुटत असलेला संवाद याचा एकत्रित परिणाम कृषी विभागाच्या कामकाजावर झाला आहे. त्यातच कृषी महोत्सवाकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ आणि परत केलेला साडेतीन कोटी रुपयांचा निधी यामुळे सध्या कृषी विभागातील वातावरण बिघडल्याचे चित्र आहे. 

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कृषी विभागाचा साडेतीन कोटी रुपयांचा निधी परत गेल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश दिल्यानंतर कृषी विभागातील कारभार आता सामोर येत आहे. तळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऐकून न घेणे, मधल्या वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा करणे आदी बाबी निधी परत जाण्यास कारणीभूत झाल्याचे बोलले जात आहे. 

तांत्रिक बाबींमुळे निधी परत गेल्याचे कारण कृषी विभागाकडून देण्यात येत असले तरी मंजूर झालेली कामे होणार नाहीत याचा वेळेत अंदाज घेण्यात कृषी विभागाचे कर्मचारी कमी पडल्याचेच दिसून येते. ई-टेडरिंग, प्रत्यक्ष वर्क ऑर्डर, काम सुरू झाले की नाही, ते किती कालावधीत होणार, मार्च अखेरपर्यंत ही कामे होणार की नाहीत, याचा अंदाज घेणे, कामे वेळेत होत नाहीत हे लक्षात येताच त्याची कल्पना वरिष्ठांना देणे, यातून त्या कामकाजाबाबत निर्णय घेणे अशी पद्धती अपेक्षित असताना मार्चच्या अखेरीपर्यंत निधी खर्च करण्याचाच आटापिटा चालला. मात्र, अनेक कामे वेळेत सुरू झाली नाहीत. 

तसेच, काहींची पन्नास टक्केही कामे झाली नाहीत. यामुळे या वेळेत कृषी विभागाला संपूर्ण निधीचा विनियोग करणे शक्‍य झाले नाही. परिणामी शेवटच्या दिवशी कृषी विभागाने हा निधी परत पाठविला. या प्रकारात कोण दोषी, कोणाचे चुकले यापेक्षा कोणत्याही विभागाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने का घेतली नाही, असाच सवाल आता शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. 
ज्या कारणांमुळे निधी परत गेला तेच कारण नुकत्याच झालेल्या कृषी महोत्सवाबाबतही आहे. या महोत्सवाच्या आयोजनाबाबत रोखठोक चर्चा न करता काही अधिकाऱ्यांच्या ‘एकाधिकार’शाहीमुळे महोत्सवाकडे शेतकरी फिरकले नाहीत. परीक्षांचे, इतर महोत्सवांचे कारण देत या अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण खरे कारण हे समन्वयाचा अभाव हेच असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच निधी परत  
राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रत्येक कृषी विभागाच्या कार्यक्रमात विविध घटकांना निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा करत असतात. पण त्यांच्याच जिल्ह्यात कृषी विभागाचा निधी परत जाणे ही बाब दुर्दैवी असल्याची चर्चा आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र सरकारी बाबूंच्या निष्क्रियतेमुळे निधी परत जात आहे.

ऐनवेळीच कारवाईचा बडगा कशासाठी?
   जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आर्थिक वर्ष संपल्यानंतर लगेच निधी परत गेल्याबद्दल कृषी विभागाला दोषी धरले. असे असले तरी याचा संपूर्ण दोष कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना न देता निधी खर्च होत नसल्याचे पाहून त्या संदर्भातील बैठका वेळीच घेतल्या असत्या तर निधी परत गेला नसता. या कामी कृषी विभागाबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयानेही त्याचवेळी ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी होती, असा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

इतर बातम्या
पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोकोअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा...
प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील...परागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा...
मराठवाड्यातील १७ लाख लोक टँकरवर अवलंबूनऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई भीषणतेच्या...
खानदेशात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ जळगाव : हिवाळ्याचे दिवस अंतिम टप्प्यात असतानाच...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षा एकाकीजळगाव : जिल्हा परिषदेत प्रशासन सदस्य,...
दरेसरसम साठवण तलावाचे काम सुरू करानांदेड : दरेसरसम (ता. हिमायतनगर) येथील साठवण...
`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळतीसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात...
`सोलापुरात टंचाई कृती आराखड्याची...सोलापूर  : टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी...
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३...सोलापूर : गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्हा...
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...