अकाेल्यातील भेंडीची चव चाखणार आखाती देश

अकाेल्यातील भेंडीची चव चाखणार आखाती देश

अकाेला  ः जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला निर्यात होणार असून, त्यादृष्टीने सोमवारी (ता. १२) शेतकरी अाणि निर्यातदार कंपनीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने करार पार पडला. या वेळी जिल्हाधिकारी अास्तिक कुमार पांडेय, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे, तहसीलदार रवी काळे, कृषी तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांच्यासह निर्यातदार कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्याने यापूर्वी केळी निर्यातीचे करार केले असून, त्याचे काम सुरू झाले. अाता दुसऱ्या टप्प्यात भाजीपाला निर्यातीच्या दृष्टीने ठोस काम केले जात अाहे. जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पिकवलेली भेंडी, कारले, दुधी भोपळा अाणि मिरची निर्यात केली जाणार अाहे. यापैकी भेंडी निर्यातीचा करार सोमवारी झाला. यात ५५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, ५० एकरांत ही भेंडी पिकवली जाणार अाहे.

भेंडी सरासरी २२ रुपये किलोचा दर निश्चित करण्यात अाला असून, दररोज २५ क्विंटल भेंडी निर्यात होईल. अशा प्रकारची दर्जेदार भेंडी पिकवण्यासाठी ॲग्रोस्टार ही कंपनी तांत्रिक मार्गदर्शन व निविष्ठा पुरविणार अाहे. नागपूरच्या इवा कंपनीने भाजीपाला निर्यातीसाठी करार केला अाहे. अातापर्यंत ५० एकरांपैकी २७ ते २८ एकरांत भेंडीची लागवड झाली अाहे. अागामी दीड महिन्यानंतर हे पीक सुरू होऊन निर्यातीचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार कंपनीमध्ये झालेल्या या करारामध्ये जिल्हा प्रशासन, कृषी तथा प्रक्रिया युक्त खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) मध्यस्थाची भूमिका वठविली. 

कराराच्या वेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पांडेय म्हणाले, निर्यातदार व शेतकऱ्यांनी अापापसात समन्वय हे काम सचोटीने व विश्वासाने पुढे नेल्यास शेतकऱ्यांना निश्चिचत फायदा होईल. जिल्ह्यात येत्या काळात पाचशे तरुण शेतकऱ्यांना सोबत घेत नवीन उपक्रम हातात घेणार असल्याचे श्री. पांडेय म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com