सांगली जिल्ह्यातील 83 तलाव कोरडे
अभिजित डाके
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

सांगली ः जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्प 83 तलाव कोरडे पडले आहेत.

दुष्काळी तालुक्‍यातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यातील चार मध्यम तलावामध्ये फक्त 2 टक्के, तर 79 लघू प्रकल्पामध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सुरू असलेल्या सिंचन योजनेतून हे तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र त्याकडे प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

सांगली ः जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्प 83 तलाव कोरडे पडले आहेत.

दुष्काळी तालुक्‍यातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यातील चार मध्यम तलावामध्ये फक्त 2 टक्के, तर 79 लघू प्रकल्पामध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सुरू असलेल्या सिंचन योजनेतून हे तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र त्याकडे प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

ऑगस्ट महिना संपला, तरी जिल्ह्यातील पावसाने सरासरी गाठली नाही. जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 247.7 मिलिमीटर म्हणजे 59.2 टक्के इतका पाऊस झाला. जिल्ह्यातील असणारे तलाव कोरडे पडले आहेत. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पिण्यालाच पाणी मिळत नाही, तर शेतीला कोठून पाणी उपलब्ध करायचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

दुष्काळी भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, यासह मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याची टंचाई दूर व्हावी, यासाठी शासनाने जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैसाळ सिंचन योजना सुरू केल्या आहेत. मात्र हे पाणी मुख्य कालव्याद्वारे वाहून जाऊन लागले आहे. मुख्य कालव्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होतो आहे.

चार मध्यम प्रकल्पात दोनच टक्क पाणीसाठा
जत, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत 4 मध्यम तलाव आहेत. त्यामध्ये केवळ दोनच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर जत तालुक्‍यातील संख मध्यम प्रकल्प कोरडा आहे. दोड्डानाला तलावात 2 टक्के पाणीसाठा आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील बसाप्पावाडी व तासगाव तालुक्‍यातील सिद्धेवाडी तलाव कोरडे आहेत. मध्यम तलावाप्रमाणे 79 लघू तलावातही केळव 14 टक्के पाणीसाठा आहे.

तलाव भरण्याची गरज
जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ, ताकारी या सिंचन योजना सुरू होऊन महिना होत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून तलाव भरण्याची मागणी वारंवार केली आहे. मात्र अद्यापही या सिंचन योजनेच्या माध्यमातून कोरडे पडलेले तलाव भरून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने हालचाली केलेल्या नाहीत. दुष्काळी भागातील हे तलाव या सिंचन योजनेच्या माध्यमातून भरून दिले, तर सुमारे वर्षभर पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना...सोलापूर  ः पुणे जिल्ह्याकडून उजनी धरणाच्या...
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊसपुणे : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) दिवसभर पावसाने...
दहा गावांतील शेतकऱ्यांचे एकाचवेळी उपोषणवणी, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे...
जळगाव येथे कोथिंबीर १८०० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात...राहुरी, जि. नगर  : महात्मा फुले कृषी...
दीक्षाभूमी त्याग, शांतता, मानवतेची...नागपूर ः नागपुरातील दीक्षाभूमी त्याग, शांतता व...
नगर : मांडओहळ धरण १०० टक्के भरले टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान...
उजनी धरणातून भीमेमध्ये पाण्याचा विसर्ग...सोलापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने...
फिनोलेक्स प्लासनसह चार ठिबक कंपन्यांना...पुणे : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून राज्यात...
पावसामुळे सोयाबीन, घेवडा कुजण्याची शक्‍... सातारा ः जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
खरीप हंगामातील उत्पादन वाढणारनवी दिल्ली ः देशात यंदा समाधानकारक पावसाच्या...
ई-पॉस यंत्रणेबाबत तांत्रिक अडचणी जळगाव  ः खतांच्या विक्रीमध्ये पारदर्शकता व...
धारवाड येथे आजपासून कृषी प्रदर्शनसंकेश्‍वर, कर्नाटक ः येथील धरावाड कृषी...
मंगळावर पाण्याचे प्रचंड साठे मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे...
सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात...सांगली : जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या शेती...
बुलेट ट्रेनने अहमदाबाद जाऊन ढोकळा...मुंबई : सोशल मिडीयात काही लपून राहत नाही. सोशल...
वादळी पावसामुळे नांदुरा तालुक्यात...नांदुरा (बुलडाणा) : काल संध्याकाळी नांदुरा...
वाहनचालकाच्या प्रयत्नातून शेतीचे...बीड : एकीकडे शेती नकोशी वाटणाऱ्यांची संख्या वाढत...
भारतात आणखी १ लाख टन गहू आयात होणार मुंबई ः पुढील काही दिवसांत केंद्र सरकारकडून...
मुंबईला पाणी पुरविणारी सातही धरणे भरली मुंबई ः तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार...