लासलगावमार्गे हापूस आंबा आॅस्ट्रेलियात रवाना

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेनंतर आता आॅस्ट्रेलियात सुरू झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन भारतातून तीन टन हापूस आंब्याची पहिली कंसायमेंट आॅस्ट्रेलियात रवाना करण्यात आली.

 या हंगामात सुरवातीला परतीचा पाऊस, ओखी वादळाचा परिणाम यामुळे यंदा आंब्याचा मोहर गळून गेल्याने निर्यातक्षम आंब्याची उपलब्धता न झाल्याने परदेशात निर्यात करण्याची प्रक्रिया १५ ते २० दिवस लांबणीवर पडली होती. या हंगामात आतापर्यंत अमेरिकेला १७० टन हापूस आंबा रवाना झाला, तर आॅस्ट्रेलियात तीन मेट्रिक टन रवाना झाला आहे.

लासलगाव येथे ३१ आॅक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्‍घाटन झालेल्या कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता फक्त आंब्यावर विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. आॅस्ट्रेलिया व अमेरिकेला जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे. 

विकिरण प्रक्रियेतून टिकवणक्षमता वाढते लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची प्रक्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीडही नष्ट होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com