‘लीली’ने शोधली चोरलेली बैलजोडी

जालना ः लिली श्वानाने शोधून दिलेली चोरीला गेलेली बैलजोडी.
जालना ः लिली श्वानाने शोधून दिलेली चोरीला गेलेली बैलजोडी.

जालना (सकाळ वृत्तसेवा) : गोठ्यात बांधलेली बैल जोडी चोरून नेल्याच्या अनेक घटना ग्रामीण भागात नेहमीच घडत असतात. मासेगाव (ता. घनसावंगी) येथे देखील बैलजोडी चोरी गेल्याची घटना घडली. यावेळी मात्र पोलिस पथकातील'लिली' हे श्‍वान शेतकऱ्याच्या मदतीला धावून आले. लीलीने शेतकऱ्यांची चोरी गेलेली बैलजोडी शोधून दिली.

मासेगाव येथील वसंत आनंदे यांची बुधवारी (ता. १३) बैलजोडी गोठ्यातून चोरट्यांनी पळविली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तत्काळ जालना येथील श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर लिली हे श्वान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळापासून लिली श्‍वानाने तीन किलोमीटर अंतरावर एका गोठ्यापर्यंत धाव घेतली.

तेथे बांधलेली बैलजोडी पाहून भुंकण्यास सुरवात केली. त्यामुळे चोरीला गेलेल्या बैलजोडीचा शोध लागला. यामुळे शेतकरी आनंदे यांनाही दिलासा मिळाला. या वेळी शेतकऱ्यांसह अनेकांनी उत्सुकतेपोटी गर्दी केली होती. श्‍वानपथकाचे कार्य आणि चोरीच्या घटनेत होणारी मदत याचे जणू यशस्वी प्रात्यक्षिकही अनेकांना पाहायला मिळाले. या वेळी पोलिस कर्मचारी बी. बी. पितळे, प्रदीप हवाले यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com