सांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीस अवघे चार दिवस उरले आहेत.
ताज्या घडामोडी
राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहे. मग महसूल मंत्री बोगस शेतकऱ्यांचे वक्तव्य कसे करू शकतात.
- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस
मुंबई ः दहा लाख बोगस शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी आहे, हे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांचे वक्तव्य निषेधार्ह असून, यातून शेतकऱ्यांप्रती सरकारची असंवेदना स्पष्ट होते. कर्जमाफी झाली नाही तर राष्ट्रवादी १ ऑक्टोबरपासून राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पत्रकार परिषदेत केली.
‘‘राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहे. मग महसूल मंत्री बोगस शेतकऱ्यांचे वक्तव्य कसे करू शकतात,’’ असा प्रश्न तटकरेंनी उपस्थित केला आहे. ७० आमदार संपर्कात आहेत उरलेले ४० ही संपर्कात आहेत अशा बातम्या काही दिवसांत येतील, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली.
कोंडाणे सिंचन घोटाळ्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, ‘‘२०१४ डिसेंबरमध्ये सरकारने आमची चौकशी घोषित केली होती. या चौकशीत आम्ही संपूर्ण सहकार्य करत आहोत. यापुढच्या काळातही मी आणि अजित पवार चौकशीला सहकार्य करू. ही बाब न्यायप्रविष्ट आहे, याबाबत चौकशीही सुरू आहे याबाबत मला अधिक काही बोलायचे नाही. राष्ट्रवादीचे आमदार कुठेही जाणार नाहीत. शिवसेनेला घाबरविण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला जातोय.’’
- 1 of 347
- ››