agriculture news in Marathi, agrowon, Make payment first; Otherwise Will not work | Agrowon

आधी पेमेंट द्या; अन्यथा कामकाज करू देणार नाही
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018

नाशिक  : उमराणे बाजार समितीत शेतकऱ्यांचे लाखो रुपये व्यापाऱ्यांकडे अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांचे हे पैसे अदा झाल्याशिवाय बाजार समितीचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

नाशिक  : उमराणे बाजार समितीत शेतकऱ्यांचे लाखो रुपये व्यापाऱ्यांकडे अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांचे हे पैसे अदा झाल्याशिवाय बाजार समितीचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धनादेशप्रकरणी फसवणूक झालेले शेतकरी आणि व्यापारी, संचालक मंडळ व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक येत्या आठवड्यात घेणार असल्याची माहिती संचालक प्रशांत देवरे यांनी दिली. संपर्क साधण्याच्या आवाहनानुसार १७५ शेतकऱ्यांनी माल विक्रीची पावती, धनादेश, धनादेश बाउन्स पावती यांच्या छायांकित प्रती जमा केल्यात. अद्यापही ३६ व्यापाऱ्यांकडे सुमारे ८५ लाख रक्कम थकीत आहे.

बाजार समितीची मार्च अखेर व्यापाऱ्यांकडे १० कोटी २५ लाख रक्कम थकीत आहे. परवाना नूतनीकरण करताना वसुलीसाठी प्रशासन गांभीर नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

उमराणे बाजार समितीत शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे धनादेशद्वारे देण्यात येत आहेत. परंतु बहुतांश व्यापाऱ्यांकडील धनादेश बाउन्स होत असल्याने लाखो रुपये अडकले आहेत. याबाबत संचालक प्रशांत देवरे यांनी बाजार समितीतील धनादेश बाउन्स, मार्केट फी, विकासकामे, व्यापारी परवाने आदींबाबत जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीकडे लेखी तक्रार केली होती. त्याची चौकशी सुरू आहे. 

बाजार समितीचे संचालक प्रशांत देवरे म्हणाले, की शेतकरी संकटात आहे. त्यांचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी आहे. व्यापारी रोख पैसे देण्याच्या तयारीत असताना ठराविक व्यापाऱ्यांचे हितसंबंध जपण्यासाठीच प्रशासन व व्यापारी असोसिएशन रोख पैसे देण्याचे लांबणीवर टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा आहे. १ जानेवारी, मार्च, मेपासून रोखीने व्यवहार सुरू करू, असे तारीख पे तारीख वायदे प्रशासनाने केल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...