व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार समिती देणार भरपाई

व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार समिती देणार भरपाई
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार समिती देणार भरपाई

मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल दोनशे शेतकऱ्यांना पाच व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांना गंडा घातल्याने या शेतकऱ्यांना बाजार समितीने थकीत रक्कम अदा करावी, या मागणीसाठी माजी आमदार संजय पवार यांनी मंगळवारी (ता. १७) सकाळी बाजार समितीजवळ उपोषण सुरू केले. बाजार समिती प्रशासनाने दोन मेपर्यंत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना निम्मी रक्कम अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने पवार यांनी उपोषण मागे घेतले.

मनमाड बाजार समिती परिसरातील दोनशे शेतकऱ्यांची पाच व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान संजय पवार यांनी शेतकऱ्यांच्या रकमा बाजार समितीने अदा कराव्यात, या मागणीसाठी मंगळवारी (ता. १७) सकाळी बाजार समितीजवळ उपोषण सुरू केले.

जि. प. सदस्य आशा जगताप, समिती संचालक अशोक पवार, राजेंद्र सांगळे, राजेंद्र पवार, बाजीराव गंधाक्षे, संजय आहेर यांनीदेखील श्री. पवार यांच्यासह उपोषण केले. दुपारी दीडच्या सुमारास बाजार समिती सभापती डॉ. संजय सांगळे, सहायक निबंधक कांदळकर यांनी पवार यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या थकीत रकमेची निम्मी रक्कम २ मेपर्यंत बाजार समिती अदा करेल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उर्वरित रक्कम २ मे नंतरच्या १५ दिवसांत दिली जाणार असल्याचे प्रशासनाने कबूल केल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com