मराठवाड्यात २२ हजारांवर शेततळ्यांची कामे पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यात शेततळ्याची २२ हजार ७३० कामे पूर्ण झाली आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मिळालेल्या आठ कोटींसह मराठवाड्यात शेततळ्याच्या अनुदानासाठी आजवर टप्प्याटप्प्याने ७२ कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मराठवाड्याला यंदा (२०१७-१८) ३९ हजार ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्राप्त उद्दीष्टांपैकी २० फेब्रुवारी अखेरपर्यंत २२ हजार ७३० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून ११३८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याने शेततळे निर्मितीत आघाडी घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ६३४५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात १९२, जालना जिल्ह्यात १५३, बीड जिल्ह्यात ३२६, लातूर जिल्ह्यात ५०, उस्मानाबाद जिल्ह्यात  १२०, नांदेड जिल्ह्यात ११२, परभणी जिल्ह्यात ३२ तर हिंगोली जिल्ह्यात १५३ शेततळ्यांची कामे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यंदा आजवर मराठवाड्याला मिळालेल्या ७२ कोटींवरील निधीमध्ये औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांसाठी मिळालेल्या ४५ कोटी ४२ लाख तर लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड या पाच जिल्ह्यांसाठी मिळालेल्या २६ कोटी ७५ लाख रुपयांचा समावेश आहे. राज्यात शेततळ्यांच्या अनुदानावर ३५५ कोटी खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये फेब्रुवारीपूर्वी प्राप्त झालेल्या १९५ कोटींसह फेब्रुवारीमध्ये प्राप्त झालेल्या १६० कोटी रुपयांचा समावेश आहे. 

आले होते ८५ हजार ०२२ अर्ज मराठवाड्यात ३९, ६०० शेततळ्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ८५ हजार ०२२ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जापैकी ६४ हजार ३४४ शेतकऱ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली होती.  तर ५५ हजार ८४३ शेततळ्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिले होते.  

जिल्हानिहाय उद्दिष्ट व पूर्ती जिल्हा                उद्दिष्ट          पूर्ती औरंगाबाद           ९१००           ६३४५ जालना               ६०००           ४९६० बीड                    ६५००           ३७५४ लातूर                  ४८००          १४८८ उस्मानाबाद         ३७००          २२२४ नांदेड                  ४०००          १२८६ परभणी               ३०००          १३६७ हिंगोली               २५००          १३०६  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com