दोडका आवक
दोडका आवक

परभणीत दोडका २५०० ते ३५०० रुपये क्विंटल

परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी (ता.२०) दोडक्याची ११ क्विंटल आवक झाली. त्यास २५०० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

बाजार समितीत वांग्याची ३० क्विंटल आवक झाली. त्यास २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ४०० क्विंटल आवक होती. टोमॅटोला ५०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक होती हिरव्या मिरचीला ८०० ते १३०० रुपये क्विंटल दर मिळाले. ढोबळी मिरचीची ७ क्विंटल आवक होती.

ढोबळी मिरचीला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. फ्लाॅवरची ३० क्विंटल आवक होती. फ्लाॅवरला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होती. कारल्याला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. काकडीची २५ क्विंटल आवक होती. काकडीला ७०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले. पालकाची ७ क्विंटल आवक होती. त्यास २००० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले.

चुक्याची ६ क्विंटल आवक होती. त्यास १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. कोथिंबीरची १५ क्विंटल आवक होती. कोथिंबिरीला ४००० ते ६००० रुपये क्विंटल दर मिळाले. मेथीच्या ६ हजार जुड्यांची आवक होती. मेथीला ५०० ते ८००० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. दुधी भोपळ्याची ६ क्विंटल आवक होती. दुधी भोपळ्याला ८०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले.

गवारीची ८ क्विंटल आवक होती. गवारीला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होती. भेंडीला १२०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. लिंबाची ८ क्विंटल आवक होती. त्यास २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. पपईची २० क्विंटल आवक होती. पपईला ८०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com