agriculture news in Marathi, agrowon, Mart's 'Krishi Tourism award' award distribute on Wednesday | Agrowon

मार्टच्या ‘कृषी पर्यटन गाैरव’ पुरस्काराचे बुधवारी वितरण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018

पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघातर्फे (मार्ट) कृषी व ग्रामीण पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कृषी पर्यटन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण बुधवारी (ता. १६) सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी दिली. 

पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघातर्फे (मार्ट) कृषी व ग्रामीण पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कृषी पर्यटन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण बुधवारी (ता. १६) सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी दिली. 

मार्टच्या संस्थापक अध्यक्षा सुनेत्राताई पवार, सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश अप्पा थोरात, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, किसान पुत्र आंदोलनाचे संयोजक अमर हबीब आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शेती अवजारे, शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. 

पुरस्कार विजेते शेतकरी

  • नितीन विष्णू घोटकुले, गोधाम कृषी पर्यटन केंद्र, आठवले बु., ता. मावळ (पुणे) 
  • सदाशिव व्यंकटेश रेडेकर, पैस फार्म कृषी पर्यटन केंद्र, कळंबा, ता. करवीर (कोल्हापूर)
  • वसंत भिकू गुरव, ऋतुराज कृषी पर्यटन केंद्र, शिखली, नळावणे, ता. खेड (रत्नागिरी)
  • केशव तुकाराम निमकर, कृषी प्रतिमा कृषी पर्यटन केंद्र, कोठा, ता. कळंब (यवतमाळ)
  • प्रकाश कांकरिया, साईबन कृषी पर्यटन केंद्र, निबळक, ता. नगर (नगर)
  • संपत राजाराम जाधव, हेरिटेजवाडी कृषी पर्यटन केंद्र, आटाळी, पेट्री (सातारा) 
  • कल्पना साळुंके, ग्राम गौरव प्रतिष्ठान, खळद, ता. पुरंदर (पुणे)
  • संतोष निंबाळकर, वनाई कृषी पर्यटन केंद्र, नारायणगाव, ता. जुन्नर (पुणे)

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...