agriculture news in Marathi, agrowon, milk producers are expected Positive decisions | Agrowon

सकारात्मक निर्णयाची दूध उत्पादकांना अपेक्षा
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 मे 2018

औरंगाबाद  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मनातील अस्वस्थेची कोंडी फोडणारे लाखगंगा गाव सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराज आहेत. दूधाला हक्क्याचे २७ रुपये दराची मागणी करणारे आणि याकरिता ग्रामसभा घेऊन सात दिवस ‘फुकट दूध घ्या’ हे अनोखे आंदोलन करणाऱ्या लाखगंगा गावातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. राज्यभरातून लाखगंगाच्या आंदोलकां पाठिंबा मिळाला असला, तरी सरकारकडे मागणी रेटविण्यासाठी आणखी दबावाची गरज व्यक्त केली जात आहे. 
 

औरंगाबाद  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मनातील अस्वस्थेची कोंडी फोडणारे लाखगंगा गाव सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराज आहेत. दूधाला हक्क्याचे २७ रुपये दराची मागणी करणारे आणि याकरिता ग्रामसभा घेऊन सात दिवस ‘फुकट दूध घ्या’ हे अनोखे आंदोलन करणाऱ्या लाखगंगा गावातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. राज्यभरातून लाखगंगाच्या आंदोलकां पाठिंबा मिळाला असला, तरी सरकारकडे मागणी रेटविण्यासाठी आणखी दबावाची गरज व्यक्त केली जात आहे. 
 

दरम्यान, दूध दराविषयी शासन प्रशासनाची सुरू असलेली खलबते त्याविषयी कानावर पडणारी माहिती यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, या आशेवर लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी तोट्यात सुरू असलेला व्यवसाय सुरू ठेवला आहे. अर्थात महागामोलाची दुभती जनावरं कमी दराने विकण्याचे सुरू असलेल्या सत्राकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. 

घसरलेल्या दूध दरामुळे कंबरडे मोडलेल्या लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी ३ ते ९ मे दरम्यान लुटता कशाला फूकटच न्या म्हणत मोफत दूध वाटप कार्यक्रम राबवून आंदोलन केले. ग्रामसभेचा ठराव घेऊन शासनाने घसरलेल्या दूध दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हस्तक्षेप करून पारंपरिक दुग्धोत्पादक गावातून बुडत चाललेल्या महत्त्वाच्या शेतीपूरक व्यवसायातील उत्पादकाला आधार देण्याची मागणी केली गेली. 

यादरम्यान शासनाने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलीटर ३ रुपये अनुदान देण्याची सांगितले, परंतु शासनाच्या या निर्णयावर आम्ही समाधानी नसल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले. उत्पादकांना थेट अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली होती.  

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
 

बंद केला धंदा तर पुन्हा उभं करणं सोपं नाही. फुकट दूध वाटल्यानं शासनस्तरावर चर्चा सुरू झाली. उत्पादकाला थेट अनुदानाची चर्चा पुढं आली, तसं केलं त बेस व्हईल. दर घसरले तवापासून ६ ते ७ रुपये प्रतिलिटर अनुदान दिलं तर किमान दुग्धव्यवसाय टिकून राहील.
- रामेश्वर पडोळ, दूध उत्पादक शेतकरी

तीन लाखात सहा गायी घेतल्या व्हत्या. त्यापैकी चार आजच प्रति ३० हजाराप्रमाणे विकल्या. दुधाला दर नसल्यानं दुभत्या जनावरांचेही दर पडलेत. तोटा सुरूच आहे, पणं सुरू असलेली खलबते पाहता, लवकर काही सकारात्मक निर्णय व्हईल या आशेवर सुरू आहे. नाही तर आणखी दोन गायी विकण्याशिवाय पर्याय नाही. 
- गोकूळ बनकर, दूध उत्पादक शेतकरी

मोडकळीस येत चाललेला आमच्या गावातील दुध व्यवसाय वाचविण्यासाठी शासनानं जाहीर केल्याप्रमाणे २७ रूपये प्रतिलिटरचे दर मिळवून द्यावे. दुध भूकटी उत्पादनाला अनुदान देवून उपयोग होईल अस वाटत नाही. उत्पादकाला अनुदान द्यायचे असेल तर ते थेट त्याच्या खात्यावर जमा करावे म्हणजे किमान व्यवसाय टिकून राहण्यास मदत होईल. 
- दिगंबर तुरकने, सरपंच, लाखगंगा

घसरलेल्या दरामुळे दुग्धव्यसाय मोडकळीस आला आहे. दुग्ध व्यवसाय बुडाला तर आधीच आतबट्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे साधण उरणार नाही. त्यामुळे वेळ न दवडता शासनाने जाहीर दर मिळवून देण्यासाठी वा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी अनुदानरूपी मदत थेट दुध उत्पादकांच्या खात्यावर मिळवून देण्यासाठी तातडीने निर्णय घेणे अपेक्षीत आहे. 
- धनंजय धोर्डे, 
शेतकरी नेते तथा दुग्ध उत्पादक, डोणगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...