agriculture news in Marathi, agrowon, Millet rate steady, inward decline | Agrowon

बाजरीचे दर स्थिर, आवक कमी
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 मे 2018

जळगाव  ः बाजरीची बाजार समित्यांमधील आवक अतिशय नगण्य आहे. आवक आणि उत्पादन हवे तसे नसताना दर मात्र अपेक्षित प्रमाणात नाहीत. मागील चार वर्षांत बाजरीच्या दरात क्विंटलमागे फक्त २५० ते ३०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती आहे. 

जळगाव  ः बाजरीची बाजार समित्यांमधील आवक अतिशय नगण्य आहे. आवक आणि उत्पादन हवे तसे नसताना दर मात्र अपेक्षित प्रमाणात नाहीत. मागील चार वर्षांत बाजरीच्या दरात क्विंटलमागे फक्त २५० ते ३०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती आहे. 

जिल्ह्यात खरिपाच्या तुलनेत रब्बीत बाजरीचे अधिक उत्पादन घेतले जाते. चाळीसगाव, चोपडा, भडगाव, जामनेर या भागात पेरणी अधिक असते. चाळीसगाव तालुक्‍यात शेतकरी बाजरीचे सर्वाधिक उत्पादन घेतात. यंदा एकरी सरासरी १० ते ११ क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. यंदा सुमारे पाच हजार हेक्‍टरवर बाजरीची पेरणी झाली होती. कापसाचे पीक काढून तसेच तूर, कांद्याच्या रिकाम्या क्षेत्रात बाजरीची पेरणी झाली होती. 

कापूस उत्पादकांनी बाजरीची पेरणी अधिक केली. अनेक शेतकरी सालगडी, मजूर यांना देण्यासह चाऱ्यासाठी बाजरीची अनेक वर्षांपासून पेरणी करीत आहेत. गव्हाप्रमाणे बाजरीचे बेवड चांगले असते म्हणूनही बाजरीची पेरणी चाळीसगाव, चोपडा भागात शेतकरी करतात. बाजरीवर नंतर कापूस लागवडीचे नियोजन शेतकरी करतात.

यंदाही असेच नियोजन अनेक शेतकऱ्यांनी केले आहे. परंतु चार वर्षे झाले तरी बाजरीचे दर अपेक्षित प्रमाणात वाढलेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. २०१५ मध्ये १२५० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. मध्यंतरी त्यात किरकोळ वाढ होत गेली. आजघडीला जागेवरच किंवा गावात खेडा खरेदीसंबंधी १५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर शेतकऱ्यांना मिळत आहेत, असे सांगण्यात आले. 

अनेक शेतकरी दर अपेक्षित प्रमाणात नसल्याने गावातच किरकोळ स्वरुपात बाजरीची विक्री करीत आहेत. तर चाळीसगाव भागात मजुरास १० किलो बाजरी देऊन एक दिवस काम, असा प्रघात आहे. पैशांच्या बदल्यात बाजरी मजूर घेतात. त्यामुळे बाजरीची विक्री न करता खरिपात मजुरीसाठी बाजरीचा उपयोग चाळीसगाव भागात शेतकरी करीत असल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यात चोपडा, अमळनेर व चाळीसगाव वगळता कुठल्याही बाजार समितीत बाजरीची आवक सध्या नाही. अमळनेरातही किरकोळ आवक आहे. चाळीसगाव बाजारात प्रतिदिन सुमारे ५० क्विंटलपर्यंतची आवक असल्याचे सांगण्यात आले. 

बाजरीची पेरणी अनेक शेतकरी चारा व घरात धान्यासाठी करतात. तसेच आमच्या भागात मजूरही बाजरी घेऊन शेतात काम करतात. पैशांऐवजी बाजरीचा वापर मजुरीचे मोल देण्यासाठी होतो. यामुळे पेरणी दरवर्षी केली जाते. यंदा उत्पादन चांगले मिळाले. बाजारात मात्र अपेक्षित दर नाहीत. चार वर्षांत फक्त २५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटलने दर वाढले आहेत. 
- नाना पाटील, शेतकरी, पिंप्री, चाळीसगाव, जि. जळगाव
 

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...