agriculture news in Marathi, agrowon, MLAs-MPs policies fevered to traders | Agrowon

आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताची
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 एप्रिल 2018

परभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन केलेल्या व्यापारीहिताच्या धोरणांमुळे; तसेच शेतकरीविरोधी कट कारस्थांनामुळे शेतकऱ्यांचे बळी जात आहेत. त्यामुळे अशा आमदार-खासदारांना फाशी द्यायला पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी (ता. १८) केली. 

परभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन केलेल्या व्यापारीहिताच्या धोरणांमुळे; तसेच शेतकरीविरोधी कट कारस्थांनामुळे शेतकऱ्यांचे बळी जात आहेत. त्यामुळे अशा आमदार-खासदारांना फाशी द्यायला पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी (ता. १८) केली. 

एकीकडे खुल्या अर्थव्यस्थेचा डिंडोरा पिटला जातो; तर दुसरीकडे निर्यातबंदी केली जाते. शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव दिला जात आहे. यामुळे आर्थिक कोंडी होत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. याच्या निषेधार्थ १४ मे रोजी राज्यव्यापी जेल भरो आंदोलन केले जाणार असल्याचे रघुनाथदादा यांनी सांगितले. शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीतर्फे काढण्यात आलेल्या हुतात्मा अभिवादन यात्रेनिमित्त परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कालिदास आपेट, सुभाष काकुस्ते, जिल्हाध्यक्ष बंडू सोळंके आदी उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी आत्महत्या हा पुरोगामी महाराष्ट्रावरील कलंक आहे. सरकार आणि विरोधक एकमेकांना दोष देण्याचे काम करत आहेत. राजकारणाच्या खेळात शेतकऱ्यांचा जीव जात आहे. उद्योजकांना कच्चा माल, कामगार स्वस्त दरात मिळाले पाहिजेत अशी धोरणे राबविली जात आहेत. त्यामुळे आमदार-खासदार हे संघटित गुन्हेगार आहेत. त्यांना फाशी दिली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक यांचा वाटून खायचा धंदा आहे. त्यांना शेतकरी कर्जमाफीसाठी फक्त झुलवत ठेवायचे असल्याची टीका रघुनाथदादा यांनी केली. तसेच अटी, शर्तीमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचे ते म्हणाले. 
 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...