कोकण, गोव्यात पावसाचा अंदाज

मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हवेचा दाब वाढल्यामुळे पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. या भागातील अनेक ठिकाणी सध्या हवामान ढगाळ असून, काही ठिकाणी ऊन पडत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे.
हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे : सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवेचा दाब कमी होत आहे, त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या गुरुवार (ता. 21) पर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आज (सोमवारी) कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसासह, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे.

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल; कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रविवारी (ता. 17) सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुणे परिसरातही काही ठिकाणी सरी पडण्याची शक्‍यता आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी रविवारी बरसल्या असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातही बारामती परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. साताऱ्यातील महाबळेश्वर भागातही हलका पाऊस पडला.

उर्वरित नगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक भागांत ढगाळ हवामान होते. काही वेळा अधूनमधून ऊन पडत होते. खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव भागात ऊन पडल्याचे चित्र होते. मराठवाडा व विदर्भातही काही भागांत ढगाळ, तर काही ठिकाणी ऊन  होते. त्यामुळे वातावरणातील उकाड्यात चांगलीच वाढ झाली होती.

कोकणातील सांगे येथे अतिवृष्टी झाली, तर म्हापसा येथे जोरदार पाऊस पडला असून, उर्वरित भागात रविवारी सकाळपर्यंत हलक्‍या सरी बरसल्या. मध्य महाराष्ट्रातील जामखेड, राहाता येथे अतिवृष्टी झाली.

शिरपूर, पाथर्डी, सटाणा, बागलाण येथे जोरदार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील जाफराबाद, केज येथेही मध्यम स्वरूपाचा, उर्वरित भागांत हलका पाऊस पडला. विदर्भातील देऊळगाव, राजा, चिखलदरा, नेर अशा काही ठिकाणी हलका पाऊस पडला.

रविवारी (ता. 17) सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) कोकण ः सांगे 80, म्हापसा 50, मार्मगोवा, पणजी 40, दाभोलीम, मुंबई, पालघर, फोंडा, शहापूर, तलासरी, वाल्पोई 30, अलिबाग, बेलापूर, कुडाळ, मुल्दे, पोलादपूर, संगमेश्वर देवरूख 20, भिवंडी, कानकोन, देवगड, दोडामार्ग, कर्जत, खालापूर, खेड, लांजा, मंडणगड, माथेरान, मुरूड, पेडणे, केपे, रत्नागिरी, सावंतवाडी, उरण 10 मध्य महाराष्ट्र ः जामखेड 80, राहाता 70, शिरपूर 60, पाथर्डी 50, मालेगाव, सटाणा, बागलाण 40, चांदवड, देवळा, खंडाळा, बावडा, नवापूर, नेवासा, पुरंदर, श्रीरामपूर 30, धुळे, गडहिंग्लज, माळशिरस, पेठ, रावेर, वाई 20, अक्कलकुवा, दहिवाडी, माण, गगनबावडा, गिधाडे, कऱ्हाड, महाबळेश्वर, पाचोरा, पन्हाळा, राहुरी, शाहूवाडी, शिराळा, सुरगाणा, येवला 10 मराठवाडा ः जाफराबाद, केज 50, फुलंब्री 30, गंगापूर, परतूर 20, अहमदपूर, मंठा, शिरूरकासार 10 विदर्भ ः देऊळगावराजा 30, चिखलदरा, नेर 20, आर्वी, चिखली, मंगळरूळपीर, तेल्हारा 10

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com