agriculture news in Marathi, agrowon, More than seven thousand five hundred anganwadi under trees | Agrowon

राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक अंगणवाड्या झाडांखाली
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 मार्च 2018

मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा नसून त्या चक्क झाडांखाली भरत असल्याची गंभीर बाब लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आली अाहे. कायमस्वरूपी इमारतींसाठीची तजवीज करण्याबाबत काही सूचना या समितीने सरकारला केल्या आहेत. 

मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा नसून त्या चक्क झाडांखाली भरत असल्याची गंभीर बाब लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आली अाहे. कायमस्वरूपी इमारतींसाठीची तजवीज करण्याबाबत काही सूचना या समितीने सरकारला केल्या आहेत. 

महिला व बालकल्याण विभागाच्या लेखापरीक्षणादरम्यान उघड झालेल्या उणिवा आणि त्रुटींची पडताळणी करून शिफारसी करणारा २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा लोकलेखा समितीचा अहवाल नुकताच विधिमंडळात मांडण्यात आला. राज्यातील ग्रामीण भागात बहुतांश अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा नसल्याची बाब समोर आली आहे. अशा वेळी गावातील एखादे मंदिर, खासगी जागा किंवा एखाद्या झाडाखाली अंगणवाडी भरवावी लागते. 

राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्या खुल्या जागेत भरवल्या जात असल्याची बाब महालेखापालांच्या अहवालात दिसून आली आहे. त्या अनुषंगाने लोकलेखा समितीने संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, राज्यात एकही अंगणवाडी झाडाखाली भरत नसून काही अंगणवाड्या खुल्या जागेत भरत असल्याचा अहवाल विभागाकडून प्राप्त झाला नसल्याचे उत्तर महिला बाल कल्याण सचिवांनी दिल्याचा उल्लेख लोकलेखा समिती अहवालात करण्यात आला आहे. 

तसेच या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी काय नियोजन करण्यात आले आहे, अशी विचारणा लोकलेखा समितीने केली असता महिला आणि बाल कल्याण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण १ लाख आठ हजार अंगणवाड्या असून त्यापैकी ६८ हजार अंगणवाड्या विभागाच्या मालकीच्या किंवा दान म्हणून मिळालेल्या इमारतीत आहेत, २७ हजार अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. तर दर तीन ते चार महिन्यांनी जागा बदलाव्या लागत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या ४ हजार ३०० इतकी आहे. 

त्यावर एकूण १ लाख ८ हजार अंगणवाड्यांची संख्या आणि तीन प्रकारच्या अंगणवाड्यांची एकत्रित बेरीज जुळत नसल्याची बाब लोकलेखा समितीने महिला बाल कल्याण विकास विभागाच्या सचिवांच्या निदर्शनास आणत कायमस्वरूपी इमारतीची तजवीज करण्याबाबत काही शिफारसी केल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...