त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
ताज्या घडामोडी
वैजापूर, जि. औरंगाबाद : दूधदराच्या प्रश्नांवर प्रत्येक तहसील कार्यालयावर येत्या १ जूनला करावयाच्या इशारा आंदोलनासाठी वैजापूर तालुका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती कामाला लागली आहे. उत्पादकांना दुधाचे दर शासनाने जाहीर केल्यानुसार मिळावेत, यासाठी आधीच संघर्षाचा बिगुल वाजविण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दूध उत्पादक संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथे १८ मे ला आमदार बच्चू कडू, डॉ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी बैठक पार पडली होती. या बैठकीत फूकट दूधवाटप आंदोलनानंतर शासनाने उत्पादकांसाठी दुधाचे दर जाहीर केल्याप्रमाणे २७ रुपये प्रतिलिटरप्रमाणे मिळावे, यासाठी कोणती पावले उचलली याविषयी चिंतन करण्यात आले.
चिंतनाअंती शासनाने दूध भुकटीला अनुदान देऊन उत्पादकांना दर देण्यासाठी ठोस काहीच न केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दुधाला रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी मिळून सरकारला जाग आणण्यासाठी १ जून २०१८ रोजी राज्यातील आपापल्या तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात आपली भाकड जनावरे बांधून आदोलन करण्याचे ठरविण्यात आले. हे इशारा आंदोलन असेल त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास ५ जुनला दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर याच्या मुंबई येथील घरासमोर दुग्धाभिषेक सत्याग्रह करणार आहेत. नियोजनानुसार न्यायासाठीच्या या लढ्याविषयी जागराचे काम हाती घेण्यात आले आहे.
वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ जूनला सकाळी ११वाजता वैजापूर तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती वैजापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
- 1 of 347
- ››