‘एमआरयूसी’च्या उपाध्यक्षपदी प्रतापराव पवार

प्रतापराव पवार
प्रतापराव पवार

मुंबई ः माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या ‘मीडिया रिसर्च यूझर्स काैन्सिल’ (एमआरयूसी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची निवड करण्यात आली. ही निवड २०१७-१८ या वर्षासाठी आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या ‘एमआरयूसी’च्या सभेत डेन्सूचे आशिष भसीन यांची संस्थेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पवार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पवार या आधी ‘एमआरयूसी’च्या संचालक मंडळात प्रकाशकांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. ‘एमआरयूसी’ गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करत आहे. इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्‍वासार्ह सर्वेक्षण ‘एमआरयूसी’च्या वतीने केले जाते. वृत्तपत्रांचे वाचक तसेच अन्य माध्यमांचे वापरकर्ते, त्यांचे आर्थिक गट, बदलत्या अपेक्षा, सवयी, बदलते तंत्रज्ञान यांबद्दल सातत्याने सर्वेक्षण करून प्रकाशक; तसेच जाहिरातदारांना योग्य माहिती ‘एमआरयूसी’कडून मिळत असते. माध्यम क्षेत्रातील बदलांचा वेळीच अंदाज घेऊन भविष्यकालीन धोरणांचा विचार करण्यासाठी ‘एमआरयूसी’च्या सदस्यांना या सर्वेक्षणांचा; तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या अभ्यासांचा फायदा होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com