उडीद, मुगाची होणार हमीभावाने खरेदी

उडीद आणि मूग
उडीद आणि मूग

पुणे : राज्यात उडदाचा दर हमीभावापेक्षा एक हजार रुपयांनी कमी झाल्यामुळे राज्य सरकारने हमीभावाने मूग आणि उडीद खरेदी करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या सात ते आठ दिवसांत मूग आणि उडीद खरेदीला सुरवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, राज्यात मूग आणि उडीद खरेदीसाठीच्या केंद्रांची संख्या निश्‍चित करण्यात आली नाही. मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले तिथे आणि महत्त्वाच्या खरेदी केंद्रांवर मूग आणि उडदाची हमीभावाने खरेदी करण्याचे राज्य सरकारने निश्‍चित केल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतमाल विक्री करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार लातूर बाजार समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

नवीन उडीद बाजार समितीत येण्यास सुरवात झाली असून, लातूरमध्ये उडदाला ४२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. या दरात आणि हमीभावामध्ये तब्बल १२०० रुपयांचा फरक असून उडदाचा हमीभाव ५४०० रुपये निश्‍चित करण्यात आलेला आहे.

राज्य सरकार हमीभाव केंद्रासाठी प्राधान्याने विचार करत आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही त्याबाबतचा निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांनी सध्या उडीद, मुगाची बाजारात विक्री करण्याची घाई करू नये. तरीही ज्या शेतकऱ्यांना तातडीने पैशांची गरज आहे, त्या शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने उडीद, मुगाची विक्री करण्यापेक्षा शेतमाल तारण योजनेचा लाभ घेऊन आपली गरज भागवावी. - सुभाष देशमुख, सहकारमंत्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com